26 February 2021

News Flash

राजकुमार रावच्या सिनेमाचं नाव बदललं; आता फक्त ‘रुही’ येणार भेटीला

11 मार्चला होणार प्रदर्शित

अभिनेता राजकुमार राव याचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्त्री’ सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. कॉमेडीचा तडका असलेल्या ‘स्त्री’ सिनेमात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकली होती. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
‘स्त्री’ सिनेमानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 11 मार्चला ‘रुही’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. ‘रुही-आफजा’ असं या सिनेमाचं नाव यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. आता ‘रुही’ असं या सिनेमाचं नावं बदलण्यात आलं आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 16 फेब्रुवारीला ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

कॉमेडीचा तडका देण्यासाठी रुही’ सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा झळकणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांची महत्वाची भूमिका आहे. हार्दिक मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
“भूतिया शादी में आपका स्वागत है” असं कॅप्शन देत ‘रुही’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 3:34 pm

Web Title: raj kumar rao and janvhi kapoor all set for film ruhi release kw89
Next Stories
1 अण्णा नाईक परत येणार…!!
2 …म्हणून लग्नाआधी केली होती निकची हेरगिरी, प्रियांकाचा खुलासा
3 ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेने गाठला ४०० भागांचा टप्पा
Just Now!
X