20 January 2020

News Flash

आई-वडिलांच्या निधनानंतर अशी होती राजकुमारची अवस्था

'प्रामाणिकपणा मी वडिलांकडून शिकलो'

राजकुमार राव

बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता राजकुमार राव सध्याच्या घडीला लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ‘स्त्री’ या चित्रपटातील दमदार अभिनयानंतर राजकुमारकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्यामुळे कलाविश्वामध्ये स्वत:च स्थान बळकट करण्यास राजकुमार यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र करिअरचा आलेख उंचावत असतानाच राजकुमारच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यावेळी तो काळ त्याच्यासाठी प्रचंड कठीण असल्याचं त्याने सांगितलं.

राजकुमार’ न्यूटन’ चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना २०१७ मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. तर सप्टेंबर २०१९ रोजी त्याच्या वडिलांचं निधन झालं. हे दोन्ही वर्ष राजकुमारसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण याच काळामध्ये त्याच्या यशाचा आलेख उंचावत होता. मात्र आई-वडिलांचं निधन होणं हे राजकुमारसाठी प्रचंड धक्का देणारं होतं.

‘एक कलाकार होऊन माझ्या आई-वडिलांना जेवढा आनंद देऊ शकत होतो. तेवढा मी देण्याचा प्रयत्न केला. आज जर ते माझ्यासोबत असते तर त्यांनी नक्कीच मला सांगितलं असतं की काम करणं महत्त्वाचे आहे, जा आणि तुझं काम पूर्ण कर. त्यांच्या निधनानंतर मी प्रचंड एकटा पडलो होतो. त्यामुळे स्वत:ला कामात गुंतून घेतलं होतं, असं राजकुमार म्हणाला.

पुढे तो म्हणतो, माझे वडील सरकारी कार्यालयामध्ये एका चांगल्या पोस्टवर काम करत होते. ते ज्या पदावर होते, त्या पदाचा वापर करुन त्यांनी अमाप धन कमवलं असतं. मात्र त्यांनी असं न करता कायम सत्याची साथ दिली आणि प्रमाणिकपणे काम करत राहिले. कामातील हा प्रमाणिकपणा मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे.

दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉय आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेड इन चायना’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मौनी रॉयने राजकुमार रावच्या पत्नीची मुख्य साकारली आहे. तर बोमण इराणीने डॉ. वर्धी या सेक्सोलॉजिस्टची व्यक्तीरेखा वठविली आहे. यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये परेश रावल, अमायरा दस्तूर, सुमीत जोशी, मनोज व्यास हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on October 12, 2019 10:05 am

Web Title: raj kummar rao on dealing with his parents demise ssj 93
Next Stories
1 ‘बिग बॉस’च्या घरात बिकिनी घालण्यास ‘या’ अभिनेत्रीचा नकार, म्हणते…
2 सेक्रेड गेम्स सिझन टू प्रेक्षकांना भावला नाही, अखेर सैफने दिली कबुली
3 बॉक्स ऑफीसवर भिडणार दोन टकले
Just Now!
X