News Flash

Raj Kundra Porn case: विनाकारण उमेश कामतला मन:स्ताप; खात्री न करता वापरला त्याचा फोटो

उमेशनं आपली नाराजी लोकसत्ता डॉट कॉमकडे व्यक्त करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा विचार असल्याचे सांगितले.

(Photo-instagram@umesh.kamat)

राज कुंद्रा पॉर्न फिल्मस प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं. राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झालीय. आता या उमेश कामतचा नी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार उमेश कामत याचा नामसाधर्म्याखेरीज काहीही संबंध नाही. परंतु काही माध्यमांनी याची शहानिशा न करता आरोपी उमेश कामतचा म्हणून कलाकार उमेश कामतचा फोटो वापरला नी उमेशला विनाकारण प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावं लागलं. उमेशनं आपली नाराजी लोकसत्ता डॉट कॉमकडे व्यक्त करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा विचार असल्याचे सांगितले.

सध्या उमेश कामत ‘अजून ही बरसात’ आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असतानाच सेटवर उमेशला फोन आणि मेसेज आले. यानंतर उमेश अस्वस्थ झाल्याचं तो म्हणाला. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना उमेश म्हणाला, “मला अनेकांचे मेसेज आणि फोन येऊ लागले. माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं हे सगळं. मी कल्पनाच करू शकतं नाही की कुणीही शहानिशा न करता असा बिनधास्त फोटो लावताय. मी कुणा कुणाला फोन करून स्पष्टीकरण देणार.” असं म्हणतं लोकांना खंर काय ते कळण्यासाठी आपण सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचं उमेश म्हणाला.

तसचं या बातमीनंतर अनेक मराठी प्रेक्षक सपोर्ट करत असल्याचं देखील उमेश म्हणाला. या प्रकरणानंतर उमेशला अमेरिका आणि दुबईमधून देखील फोन आले. “या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. माहित नाही या मुळे मला किती आणि कुठपर्यंत नुकसान सहन करावं लागेल. किती वेळ मला स्पष्टकरण द्यावं लागेल. यासंबधी मी लिगल टीमशी बोलत आहे.” असं म्हणत उमेशने कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

umesh- kamat-post (Photo-instagram@umesh.kamat)

हे देखील वाचा: “माझा मोबाईल नंबर लीक केला आणि…”; पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप

उमेश कामतने व्यक्त केली खंत

तसतं माध्यमांनी चुकिचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याची खंत उमेशने व्यक्त केली. ” फक्त बातमी काढून काही उपयोग नाही. जे पसरायचं आहे ते आधीच पसरलंय. वृत्त वाहिन्यांनी त्याच्या बातमी पत्रात चूक झाल्याचं मान्य करत ती चूक सुधारणं गरजेचं आहे. मात्र अजूनही तसं काही झालेलं नाही.” असं म्हणत उमेशने नाराजी व्यक्त केली.

उमेशमे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 11:22 am

Web Title: raj kundra porn case some media use marathi actor umesh kamat photo mistaken as accused in raj kundra case actor take legal action kpw 89
Next Stories
1 ‘कसौटी जिंदगी के’ अभिनेता साहिल आनंदने ‘या’ कारणासाठी मागितली फॅन्सची माफी
2 “माझा मोबाईल नंबर लीक केला आणि…”; पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप
3 गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन
Just Now!
X