बॉलिवूडमधले सगळ्यात जास्त चर्चेत आलेले कपल अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांसाठी आजचा दिवस कायम आठवणीत राहणार आहे. सध्या या दोघांचं करिअर एका नाजुक वळणावर येऊन पोहोचलंय. एकीकडे पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या राज कुंद्राला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तीन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा बहुचर्चित ‘हंगामा २’ हा चित्रपट आजच डिज्नी हॉटस्टार रिलीज होतोय.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा बॉलवूडमध्ये कमबॅक करतेय. यासाठी ती खूपच उत्सुक होती. तिचा ‘हंगामा २’ या चित्रपटाच्या रिलीजला काही दिवसच उरले होते, तितक्यात तिचा पती राज कुंद्राने पॉर्न फिल्म्स बनवल्याबाबतचे हे प्रकरण उघड पडले. या प्रकरणानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ माजली. या प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याआधीच पोलिसांनी राज कुंद्राला अटक सुद्धा केली. पती राज कुंद्राचं नाव या प्रकरणात येऊ लागल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्दा माध्यमांपासून थोडा दूरावा ठेवताना दिसून आली. इतकंच काय तर शिल्पा तिच्या ‘सुपर डान्सर’ च्या सेटवर शूटसाठी देखील आली नाही. काही दिवसांवर रिलीजसाठी तयार असलेल्या तिच्या ‘हंगामा २’ चित्रपटाचं प्रमोशन सुद्धा शिल्पा शेट्टीला हवं तसं करता आलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

कुटुंबावर अचानक कोसळलेलं संकट आणि विवादात अडकलेला पती अशा परिस्थितीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं आजचं कमबॅक हे मात्र थोडं फिक्या पद्धतीने होत असल्याचं दिसून येतंय. शिल्पा आणि राज या दोघांच्या प्रोफेशनल लाइफसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज या दोघांचं करिअर टांगणीला लागलं असून त्यावर आज फैसला होणार आहे. आज रिलीज होत असलेला शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ हा चित्रपट तिच्या अभिनयाचा जलवा यापुढे सुद्धा बॉलिवूडमध्ये सुरू राहू शकतो का? हे ठरवणार आहे. १४ वर्षानंतरचं तिचं आजचं कमबॅक बॉलिवूडमधलं तिचं भविष्य ठरवणार आहे.


तर दुसरीकडे राज कुंद्रावर सुरू असलेला खटला त्याचं पुढचं करिअर तग धरून राहणार की डुबणार? हे ठरवणार आहे. या प्रकरणात राज कुंद्राला शिक्षा देखील होण्याची शक्यता आहे. जर शिक्षा झाली तर त्याच्या प्रोफेशनल लाइफमध्ये त्याला मोठं नुकसान झेलावं लागणार आहे. पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरण उघड पडल्यानंतर राज कुंद्राची प्रतिमा आधीच सोशल मीडियावर खराब झाली आहे. सोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. या कपलच्या बाबतीत सोशल मीडियावर नकारात्मक वातावरण तयार झालंय. राज कुंद्राच्या या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीचं कमबॅक, स्टारडम आणि स्टेट्सवर बराच प्रभाव पडला आहे.

आता आजच्या दिवसभरात शिल्पाचा चित्रपट आणि राज कुंद्रावरची सुनावणी हे पाहिल्यानंतरच पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वांचं असणार आहे. आजचा दिवसच या दोघा कपलचं पुढचं भविष्य ठरवणार आहे.