News Flash

“मी अडल्ट सिनेमांच्या विरोधात नाही”; राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री सोमी अलीचं खळबळजनक वक्तव्य

९०च्या दशकामध्ये सिनेमांपेक्षा सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे सोमी अली जास्त चर्चेत आली होती.

somy-ali-raj-kundra-case
(File Photo_

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली असून राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी समोर येत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राज कुंद्रावर आरोप केले आहेत तर काहींनी मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. यातच आता अश्लील सिनेमांबद्दल अभिनेत्री सोमी अलीने मोठं वक्तव्य केलंय.

सोमी अलीने मोठ्या काळापासून बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे. मात्र राज कुंद्रा प्रकरणानंतर आता सोमीने पुढे येत तिची बाजू मांडली आहे. हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने अश्लील सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल ही वक्तव्य केलंय. ती म्हणाली, “कोणतीही जबरदस्ती न करता किंवा दबावास बळी न पडता ज्या अभिनेत्री करिअर म्हणून स्वत:हून अश्लील सिनेमांमध्ये काम करणं निवडतात त्यांना मी जज करत नाही.” असं सोमी म्हणाली.

हे देखील वाचा: शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल; “पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष” म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमी अली पुढे म्हणाली, “कुणावरही जबरदस्ती होवू नये हे महत्वाचं आहे. अन्यथा जर कुणीही अडल्ट सिनेमात काम करण्याचा निर्णय घेत असले तर यात मला किंवा इतर कुणालाही हरकत नसावी. आपल्याला कुणाचंही परिक्षण करण्याचा अधिकार नाही.” तर अश्लील सिनेमांबाबत बोलताना सोमी अला म्हणाली, “मी याला सिनेमातील कलात्मक प्रगती मानते. २०२१ सालामध्ये आता आपण प्रगती करणं गरजेचं असून सेक्स एजुकेशन देण्याची गरज निर्माण झालीय. जर इंटिमेट लव सीन्समध्ये  तसे इंटिमेट सीनच नसतील तर काय उपयोग.” असं सोमी अली म्हणाली आहे.

हे देखील वाचा: ‘त्या’ एका जाहिरातीने बदललं हुमा कुरेशीचं आयुष्य; ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये झळकण्याची मिळाली संधी

या मुलाखतीमध्ये सोमी अलीने आपण अश्लील सिनेमांच्या विरोधात नसल्याचं वक्तव्य केलं आहे. ९०च्या दशकात बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये सोमी अलीने काम केलंय. मात्र सिनेमांपेक्षा सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे सोमी अली जास्त  चर्चेत आली होती. अनेक वर्षांनतर सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडसह भारताकडे पाठ फिरवली आणि ती परदेशात निघून गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 12:20 pm

Web Title: raj kundra pron film case actress somy ali support adult films said we do not judge pepole who choose adult films as profession kpw 89
Next Stories
1 ‘भाभीजी घर पर हैं’ फेम सौम्या टंडनचा करीना कपूरच्या गाण्यावर डान्स
2 ‘चित्रपट फ्लॉप ठरला आणि डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले’; दिग्दर्शकाने सांगितला अनुभव
3 Birthday Special: ‘त्या’ एका जाहिरातीने बदललं हुमा कुरेशीचं आयुष्य; ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये झळकण्याची मिळाली संधी
Just Now!
X