बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटकेपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून राज कुंद्राची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी पॉर्न चित्रपट आणि पॉर्न अॅप प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. पॉर्न बंद केलं जाईल याची पूर्व कल्पना राज कुंद्राला आधीच आली होती, असं या चौकशीतून समोर आलं असून, त्याने त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती. एवढंच नव्हे तर त्याने ‘प्लॅन ‘बी’देखील यासाठी तयार होता. अटकेनंतर राज कुंद्राचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले असून, या चॅटमध्ये राज कुंद्रा रॅकेटमधील सहकाऱ्यांशी प्लॅन बी बद्दल बोलल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी, गुगल प्ले मुळे त्याचं ‘हॉटशॉट’ हा अॅप सस्पेंड करण्यात आलं होतं. असं काही होईल याची कल्पना राज कुंद्राला आधीच होती आणि त्यामुळे त्याने प्लॅन बी तयार केला होता. या सगळ्याची चर्चा ही हॉट्सअॅपवर असलेल्या ‘एच’ नावाच्या ग्रुपवर झाली होती. प्रदीप बक्षीने एक पीडीए फाईल शेअर केली होती ज्यात ‘हॉटशॉट’ अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्याचा उल्लेख होता. तेव्हा राज कुंद्रा म्हणाला होता की,’हरकत नाही, प्लॅन बी सुरु झाला आहे. नवीन अॅप जास्तीत जास्त २ ते ३ आठवड्यांमध्ये सुरु होईल.’

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

खरतरं ‘बी’ प्लॅनचं नाव बोलिफेम आहे. पोर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं नेता यावं यासाठी राज कुंद्राने हा प्लॅन तयार केला होता. राज कुंद्रा आणि बक्षीतील हे चॅट पोलिसांना कामतच्या फोनमधून मिळाले आहेत. कामतला फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.