News Flash

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम द्या- शालिनी ठाकरे

'देवा' या मराठी चित्रपटाला अपेक्षित स्क्रीन्स उपलब्ध झालेल्या नाहीत.

शालिनी ठाकरे

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो उपलब्ध व्हावेत यासाठी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. अभिनेता अंकुश चौधरी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या देवा- एक अतरंगी या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन त्यांनी ही मागणी केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या तुलनेत ‘देवा’ या मराठी चित्रपटाला अपेक्षित स्क्रीन्स उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे मराठी चित्रपटांनाही हिंदी प्रमाणेच प्राइम टाइम शो उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

VIDEO : खिलाडी कुमार म्हणतोय, ‘पाहायला विसरु नका…. देवा’

मराठी चित्रपटांच्या स्क्रीन्सही हिंदी चित्रपटांनाच मिळणार असतील तर आमचा याला विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी चित्रपटांच्या बाजूने बोलत असताना आम्ही कोणालाच धमकावण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोणालाही धमकावण्याचा आमचा हेतू नसून, ‘देवा’ला अपेक्षित स्क्रीन्स मिळाव्यात इतकीच आमची अपेक्षा आहे, याच मुद्द्यावर त्या ठाम होत्या. २२ डिसेंबरला बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आणि अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असणारा ‘देवा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच आता याविषयी पुढे कोणता निर्णय घेतला जाणार आणि मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो मिळण्याचा मुद्दा किती गाजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 6:10 pm

Web Title: raj thackerays mns leader shalini thackeray marathi films must be given prime time shows in theaters maharashtra
Next Stories
1 ही आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा
2 चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक का करु, रिचाचा सवाल
3 करिश्माने शेअर केला तैमुरचा क्यूट फोटो
Just Now!
X