News Flash

खाकी वर्दीत संजूची वटपौर्णिमा; रणजीतची मिळाली साथ

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेमध्ये संजू वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेमध्ये संजू वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

संजूची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळी असणार आहे. नोकरीचं आणि घराचं कर्तव्य संजू पार पाडताना दिसणार आहे. यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे.

राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजुसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत. पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजू उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले. गुलाब संजूच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे.

त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण होणार नाही यासाठी गुलाबच्या कुरघोड्या सुरू आहेत. तर दूसरीकडे कुसुमावतीला देखील संजुने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 4:55 pm

Web Title: raja raanichi jodi ga sanjivani celebrate vatpournima in police uniform kpw 89
Next Stories
1 मैत्री पलीकडच्या नात्याची गोष्ट; ३० जूनला झळकणार ‘जून’ सिनेमा
2 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ना मिळणार छोट्या वादकांची साथ
3 Viral Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे..’, स्टाफकडून सॅण्डल काढून घेतल्याने शहनाज गील झाली ट्रोल