21 January 2021

News Flash

अभिनेत्री किम शर्मा अडचणीत

मुंबईत तिच्याविरोधात गुन्हा दाखल

किम शर्मा

बॉलिवूडची एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री किम शर्मा तुम्हाला आठवतेय का? मोहोब्बतें सिनेमातून किमने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण किमचं बॉलिवूडमध्ये बस्तान काही बसलं नाही आणि ती हळू हळू बॉलिवूडमधून गायब झाली. पण आता किम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाही… नाही.. तिचा कोणताही सिनेमा येत नाहीये तर राजस्थानच्या दिलीप कुमारने या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. मुंबईच्या खार पोलीस स्थानकात किम शर्माविरुद्ध दिलीपने तक्रार दाखल केली आहे.

या व्यक्तीच्या मते, किमने त्याची कोट्यवधींची रुपयांची रेंज रोवर गाडी स्वतःकडे ठेवली असल्याचे म्हटले आहे. दिलीपने ती गाडी किमच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याला म्हणजे अली पुंजानी याला दिली होती. मात्र आता किमने ती गाडी जबरदस्ती स्वतःकडे ठेवल्याचे म्हटले आहे.
दिलीप कुमार हा एक एनआरआय व्यावसायिक आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो परदेशातच राहतो. क्वचितच मुंबईत येणं होत असल्यामुळे दिलीपने त्याची रेंज रोव्हर गाडी अली याच्या खार घराच्या आवारात ठेवायला दिली होती. जेव्हाही दिलीप मुंबईत यायचा तेव्हा तो हॉटेलमध्ये राहायचा आणि त्याची ही गाडी वापरायचा. दरम्यानच्या दिवसांमध्ये दिलीपची गाडी किम वापरत होती. दिलीपने किमकडे स्वतःची गाडी परत मागितली असता तिने ती देण्यास स्पष्ट नकार दिला.

२०१७ मध्ये दिलीपने या प्रकरणी याआधीही तक्रार दाखल केली होती. मात्र ती तक्रार किमविरोधात दाखल न होता तिचा पती अलीच्याविरोधात दाखल झाली होती. तक्रार मराठीत असल्याने दिलीपला ती कोणाविरोधात केली हे कळले नव्हते. मात्र आता ही चूक लक्षात येता त्याने किमविरोधात एफआयआर नोंदवली आहे. यावर ‘मिड-डे’नं पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार किमची प्रतिक्रिया घेतली असता, ‘ही कार आपल्याला पती पुंजानीनं दिलीय मग ती मी दिलीप कुमार यांना का देऊ?’ असा उलट प्रश्न तिने विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 5:35 am

Web Title: rajasthan businessman dilip kumar accuses kim sharma of illegally using his car
Next Stories
1 सलमान खानचे भवितव्य आज ठरणार 
2 ऐश्वर्या नारकरची सेटवर खवय्येगिरी
3 प्रदर्शित झाल्यानंतर ‘बबन’चा शेवट बदलला
Just Now!
X