05 April 2020

News Flash

‘त्या’ अनैसर्गिक कृत्यावर स्वरा भास्कर भडकली, म्हणाली…

गुदद्वारात पेट्रोलमध्ये बुडवलेला स्क्रू ड्रायव्हर घुसवून तरुणाचा छळ केला.

राजस्थानमधील करनू येथे दोन मागासवर्गीय तरुणांवर चक्क स्क्रू ड्रायव्हरने क्रूरपणे हल्ला करण्यात आला. त्यांच्या गुदद्वारात पेट्रोलमध्ये बुडवलेला स्क्रू ड्रायव्हर घुसवून त्या तरुणांचा छळ करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक प्रकारावर अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य पाहा – रुपेरी पडद्यावर ‘सविता भाभी’ साकारणारी पहिली अभिनेत्री

काय म्हणाली स्वरा?

“घृणास्पद अत्याचा! हा व्हिडीओ मी पाहू शकत नाही. या तरुणांवर होणारा अत्याचार अक्षरश: घृणास्पद आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

काय घडला होता प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार पच्चूराई पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील गॅरेजमध्ये दोन मागासवर्गीय तरुण गाडीची सर्व्हिसिंग करुन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी या दोघांवर पैसे चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर या दोघांना कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. या दोघांचे हात पाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांपैकी एकाची पॅण्ट काढण्यात आली. त्यानंतर त्याच्या गुदद्वारात पेट्रोलमध्ये बुडवलेला स्क्रू ड्रायव्हर घुसवून त्याचा छळ करण्यात आला. हे दोघेही “आम्ही चोरी केली नाही”, असं सांगत दयेची याचना करत होते. मात्र गॅरेजमधील कर्मचारी त्यांना मारहाण करत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 3:58 pm

Web Title: rajasthan screwdriver dipped in petrol inserted into man for stealing money sickening video goes viral swara bhaskar mppg 94
Next Stories
1 पुणेकर लय भारी! सिद्धार्थची हॉलिवूडमध्ये एण्ट्री
2 ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शकाच्या मुलीला व्हायचयं पॉर्नस्टार
3 क्रिती सेनॉन आई होणार? फोटो व्हायरल
Just Now!
X