25 November 2020

News Flash

‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गईं हैं’; राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राजीव खंडेलवाल साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

सध्याचा जमाना हा वेब सीरिजचा असल्याचं म्हटलं जातं. या सीरिजच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर उघडपणे भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे या सीरिज पाहण्याकडे तरुणाईचा कल अधिक असल्याचं दिसून येतं. सध्या या सीरिजसाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज असंख्य वेब सीरिजची रेलचेल सोशल मीडियावर पाहायला मिळते. यातच आता नक्षलबारी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पार्थ मित्रा दिग्दर्शित या सीरिजमध्ये जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठी सुरु असलेली चळवळ व व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला लढा दाखविण्यात येणार आहे. या सीरिजची निर्मिती ‘जिसिम्स’अंतर्गत करण्यात येत आहे. या सीरिजचं गोव्याजवळ चित्रीकरण पार पडलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Khandelwal (@simplyrajeev)


‘नक्षलबारी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची, त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेब सीरिज या चळवळीचा आणि लढ्याचा जवळजवळ प्रत्येक कंगोरा समोर आणते, असं या टीझरमध्ये दिसून येतं.

दरम्यान, ‘नक्षलबारी’ ही ‘जीसिम्स’ची पहिली वेब सीरिज असून लवकरच ती ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. तर टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद,आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 5:01 pm

Web Title: rajeev khandelwal new web series naxalbari ssj 93
Next Stories
1 आगामी चित्रपटांसाठी कंगना रणौतची मेहनत; शेअर केला फोटो
2 आणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित
3 अनुपम खेर यांचा मुलगा झाला बेरोजगार?; सोशल मीडियावरुन मागतोय काम
Just Now!
X