27 September 2020

News Flash

राजेश खन्ना यांनी लग्नापूर्वी सात वर्षे या अभिनेत्रीला केलं होतं डेट

राजेश खन्ना यांचे खासगी आयुष्यसुद्धा बरेच रंजक होते.

राजेश खन्ना हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी सलग १५ सुपरहिट चित्रपट देत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या चित्रपटांनी खऱ्या अर्थाने एक काळ गाजवला. अशा या अभिनेत्याचे खासगी आयुष्यसुद्धा बरेच रंजक होते.

सुरुवातीच्या काळात राजेश खन्ना अभिनेत्री अंजू महेंद्रू यांना डेट करत होते. ७०च्या दशकात त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वदूर पसरल्या होत्या. जवळपास सात वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण, कालांतराने डिंपल कपाडियासोबत राजेश खन्ना यांचं नाव जोडले गेले आणि अंजूसोबतच्या त्यांच्या नात्यात दुरावा आला.

त्यानंतर राजेश खन्ना यांच्या आयुष्यात तिची जागा भरुन काढण्यासाठी दुसऱ्याच मुलीची एंट्री झाली होती. ती मुलगी होती डिंपल कपाडिया. पाहताच क्षणी डिंपलच्या सौंदर्यावर भाळलेल्या या सुपरस्टारने तिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी डिंपल राजेश खन्नांपेक्षा १६ वर्षाने लहान होत्या. त्यामुळे त्यांचं हे नातंसुद्धा चर्चेचा विषय ठरले.

डिंपल कपाडियासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी चक्क त्यांच्या वरातीची वाट बदलली होती. मुख्य म्हणजे त्यांनी ठरलेल्या रस्त्यावरुन न जाता अंजू महेंद्रूच्या घराजवळून जाणारा रस्ता वरातीसाठी निवडला. हे करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता याविषयी तेच जाणत असावेत. पण, त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना वरातीचा किस्सा सुद्धा आवर्जून सांगितला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 1:05 pm

Web Title: rajesh khanna anju mahendru dimple kapadia mppg 94
Next Stories
1 ‘फ्युचर’ की ‘फिगर’; दीपिकाला कशाची वाटते भीती?
2 आपली वाटचाल हिंसक, आपण पाकिस्तान होत चाललोय – भालचंद्र नेमाडे
3 अक्षयसाठी ‘गुड न्यूज’ तर सलमानसाठी ‘बॅड न्यूज’!
Just Now!
X