23 October 2018

News Flash

…म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो

बिग बजेट सिनेमाच्या मिळकतीत नुकसान होण्याची शक्यता

आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार '२.०'

यावर्षात अनेक बॉलिवूड सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकाच दिवशी दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार असल्यामुळे एका सिनेमातरी त्याचा फटका बसतोच. ४५० कोटी रुपयांच्या बजेटची निर्मिती असलेल्या ‘२.०’ हा सिनेमालाही याचा फटका बसेल असे म्हटले जात आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ सिनेमाची त्यांचे चाहते प्रकर्षाने वाट पाहत आहेत. पण या सिनेमासोबतच अजून तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामुळे या बिग बजेट सिनेमाच्या मिळकतीत नुकसान होण्याची शक्यता असते. सुरूवातीला अक्षय कुमारचे पॅडमॅन आणि ‘२.०’ हे दोन्ही सिनेमे जानेवारीत एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. पण ‘२.०’ सिनेमाने माघार घेत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ती २७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली.

रजनीकांत यांच्या ‘२.०’ सिनेमासोबत अजून तीन बिग बजेट सिनेमे त्याच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा ‘बागी २’, कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ आणि ‘अँवेंजर्स इन्फिनिटी वॉर’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होत आहे. २.० प्रमाणे इतर तीन सिनेमांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘बागी’ सिनेमा फार हिट झाला होता. त्याचा ‘बागी २’ हा सिक्वल आहे. तसेच ‘मणिकर्णिका’ हा कंगनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर ‘अँवेजर्स’चा स्वतःचा असा वेगळा वर्ग आहे. अशावेळी ‘२.०’ सिनेमा किती गल्ला कमावणार हाच मोठा प्रश्न आहे.

First Published on January 2, 2018 2:22 pm

Web Title: rajinikanth and akshay kumar 2 0 could be flop on box office for this reason