News Flash

३५ वर्षानंतर रजनीकांत-कमल हासन येणार एकत्र

लोकेश कानगराज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या आगामी चित्रपटाची घोषणा केली.

भारतीय सिनेसृष्टीतील दोन मेगास्टार रजनीकांत आणि कमल हासन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून चाहते या दोन मेगास्टार अभिनेत्यांना एकत्र पहाण्यासाठी उत्सुक होते. अखेर ३५ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत व कमल हासन पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

लोकेश कानगराज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या आगामी चित्रपटाची घोषणा केली. मात्र, त्यांनी या चित्रपटाचे नाव, कथानक किंवा रजनीकांत व कमल हासन यांच्या भूमिकेंबाबत कुठल्याही स्वरुपाची माहिती दिली नाही. “मी रजनीकांत व कमल यांना चित्रपटाचे कथानक वाचायला पाठवले होते. दोघांनाही कथानक खुप आवडले आहे. ३५ वर्षानंतर दोघे एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या काळात मी चित्रपटाची अधिकृत घोषणा करेन.” असे लोकेश कानगराज म्हणाले.

सध्या कमल हासन ‘इंडियन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे रजनीकांत देखील ‘दरबार’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘दरबार’ येत्या १५ जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 12:05 pm

Web Title: rajinikanth and kamal haasan to join hands for a film after 35 years mppg 94
Next Stories
1 Video : सलमान-शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स केला म्हणून अभिनेत्याला पोलिसांनी पकडले
2 मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक
3 वाहिन्यांत भीम दिसतो गा..
Just Now!
X