25 February 2021

News Flash

रजनीकांतच्या मुलीचा प्रताप! भरधाव कारने रिक्षाला उडवले

या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला

सौंदर्या रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. मंगळवारी सकाळी तिने तिच्या कारने एका रिक्षाला धडक दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्याच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली. अलवारपेट येथे ही घटना घडली.

रिक्षाला धडक दिल्यानंतर सौंदर्याला हे प्रकरण वाढवायचे नव्हते. पण त्या रिक्षा चालकाने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. हे सर्व प्रकरण वाढत गेल्यानंतर सौंदर्याने, धनुषला फोन केला. थोड्याच वेळात धनुषही घटनास्थळी पोहोचला आणि त्या रिक्षा चालकाला समजावण्याचा प्रयत्न करु लागला. धनुषच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणाबद्दल कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आली नाही. या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला, त्यामुळे डॉक्टरांचा खर्च आणि रिक्षाची दुरुस्ती करुन देण्याच्या अटीवर हे प्रकरण संपवण्यात आले.

सौंदर्याने ‘कोच्चदियान’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे सौंदर्याने दिग्दर्शनातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने एका व्यावसायिकाशी लग्न केले. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. तिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सध्या ती धनुषचा आगामी सिनेमा ‘वेलाइ ईल्ला पट्टधरी २’ या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे.

धनुषही सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. त्याचे खरे आई-बाबा कोण हा वाद सध्या न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तमिळनाडूमधील एका जोडप्याने धनुष आमचाच मुलगा आहे असे सांगत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी धनुषला त्याचे खरे आई- बाबा कोण हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या अंगावर असलेल्या जन्मखुणे संदर्भातही काही चाचण्या कराव्या लागल्या होत्या. या चाचण्या आता आर कथिरेसन आणि त्यांची पत्नी के मिनाक्षी यांच्याशी जुळून येतात की नाही हे काही दिवसांत कळेलच. पण हे जोडपे फक्त पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे धनुषने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 4:18 pm

Web Title: rajinikanth daughter soundarya rajinikanth hits auto with her car injures driver
Next Stories
1 VIDEO: ‘इथे सारे दीड शहाणे..’पुणेरी रॅप साँग ऐकलेत का?
2 प्रियांका आणि माझ्यात शत्रुत्व नाही- दीपिका पदुकोण
3 ‘हिचकी’मधून राणी करणार पुनरागमन
Just Now!
X