News Flash

थोडी तरी लाज बाळग, हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे सौंदर्या ट्रोल

पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

सौंदर्या, विशगन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्याने व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी याच्याशी सोमवारी (११ फेब्रुवारी) लग्नगाठ बांधली. चेन्नईतल्या द लीला पॅलेस येथे हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार या लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर सौंदर्या विशगनसोबत सध्या हनीमूनला गेली असून तिने काही या हॉलिडेचे काही फोटोही शेअर केले आहेत. मात्र सौंदर्याने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या परिस्थितीचं जराही गांभीर्य न बाळगता सौंदर्याने हनीमूनचे फोटो शेअर केले. तिच्या याच गोष्टीमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.

सौंदर्या सध्या विशगनसोबत तिचा क्वालिटी टाईम व्यतीत करत असून तिने तिचे काही फोटो शेअर करत आहे. सौंदर्याने नुकताच विशगनसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते बर्फाळ प्रदेशात असून ते दोघही मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सौंदर्यावर टिकेची झोड उठविली असून ‘थोडी तरी लाज बाळग’, असं म्हटलं आहे.

‘आपल्याला शांत झोप मिळावी यासाठी आपल्या देशाचे जवान तिथे सिमेवर प्राणाची बाजी लावत आहेत. पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यामुळे देशावर शोककळा पसरली आहे आणि तू सुट्टी एन्जॉय करतेस? निदान दोन दिवस तरी दुखवटा पाळायला हवा होतास’, असं एका नेटकऱ्याने सौंदर्याला सुनावलं आहे.

‘तूला तुझी सुट्टी एन्जॉय करायची आहे,तर नक्कीच कर. पण निदान या प्रसंगी ते फोटो शेअर तरी करुन नकोस. मी असं का सांगतोय हे तुम्हाला समजलं असेलच’, असंही एका युजरने म्हटलं आहे. तर ‘एका नेटकऱ्याने सुट्टी एन्जॉय कर पण त्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खातही सहभागी हो’, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्या आणि विशगन दोघंही घटस्फोटीत आहेत. २०१० मध्ये सौंदर्यानं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 9:08 am

Web Title: rajinikanth daughter soundarya rajinikanth trolls honeymoon photos
Next Stories
1 शहिदांसाठी ‘भारत के वीर’ने अक्षयच्या मदतीने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी
2 पुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..
3 Pulwama Terror Attack: शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटी बंद
Just Now!
X