रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेले दोन दिवस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती पूर्णपणे स्थिर आहे. परिणामी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयानं एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करुन ही आनंदाची बातमी रजनीकांत यांच्या चाहत्यांना दिली आहे.

अवश्य पाहा – मिथून चक्रवर्ती यांची ग्लॅमरस सून; फोटो पाहून व्हाल अवाक्

अवश्य पाहा – अरबाजसोबत लग्न करणार का? जॉर्जिया म्हणाली, “लग्नाचा विचार…”

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रजीनकांतही क्वारंटाइन झाले होते. दरम्यान त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. तसंच त्यांना सध्या इतर कसलाही त्रास जाणवत नसल्यामुळे रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.