News Flash

Video : ‘रजनी’प्रेमात चाहते सैराट; एण्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट ३ मिनिटं केला ‘पॉझ’

थलैवाच्या एण्ट्रीवर चाहते बेधुंद होऊन स्क्रीनसमोर नाचू लागले.

rajinikanth
'रजनी'प्रेमात चाहते सैराट

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे चाहत्यांसाठी जणू उत्सवच. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी पहिल्या शोपासूनच गर्दी केली. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘2.0’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रजनीकांतसाठी प्रेम व्यक्त करताना चाहतेसुद्धा सैराट होतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं. आता ‘2.0’च्या प्रदर्शनानंतरही तीच क्रेझ पाहायला मिळाली. एका चित्रपटगृहात रजनीकांत यांची एण्ट्री साजरी करण्यासाठी चक्क चित्रपट तीन मिनिटांसाठी थांबवला.

रजनीकांत यांची स्टाईल, त्यांची एण्ट्री, त्यांचं अभिनय सर्वच चाहत्यांना भारावून टाकणारं असतं. एका चित्रपटगृहात ‘2.0’ प्रदर्शित होत असताना रजनीकांत यांच्या एण्ट्रीच्या वेळी तीन मिनिटांसाठी चित्रपट पॉझ करण्यात आला. थलैवाच्या एण्ट्रीवर चाहते बेधुंद होऊन स्क्रीनसमोर नाचू लागले. चाहत्यांचा हा एकप्रकारे ‘रजनी’उत्सवच होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video : जेव्हा चाहताच सईसाठी ठरतो खलनायक

‘2.0’ हा भारतातील सर्वांत महागडा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी जवळपास ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रजनीकांत, अक्षय कुमार यांच्यासोबत अॅमी जॅक्सनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 5:01 pm

Web Title: rajinikanth fans paused 2 point 0 to celebrate his entry watch video
Next Stories
1 अन् त्याने मुलाचे नाव ठेवलं ‘मतदान
2 …आणि म्हणून अलेक्सा म्हणते “अभी ना जाओ Beeeeppp कर”
3 अबब! तब्बल १४०० किलो वजनाची धष्टपुष्ट गाय, उंची ऐकून व्हाल थक्क
Just Now!
X