18 January 2019

News Flash

Kaala Movie Box Office Collection Day 4 : ‘काला’च्या कमाईने ओलांडला शंभर कोटींचा आकडा

Kaala Movie Box Office Collection Day 4 अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही चित्रपटाचं प्रदर्शन चांगलं सुरु असल्यामुळे कमाईच्या आकड्यांचा आलेख उंचावत आहे.

रजनीकांत, Kaala Movie Box Office Collection Day 4

Kaala Movie Box Office Collection Day 4. बॉक्स ऑफिस कमाईच्या आकड्यांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही काही सेलिब्रिटींसाठी जणू एक सवयच असते. अशाच सेलिब्रिटींपैकी एक नाव म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर असणाऱ्या रजनीकांत यांची महत्त्वाची भूमिका असणारा ‘काला’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्यानंतर बॉक्स ऑफिसपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत सर्वत्रच ‘काला’च्या चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

‘थलैवा’ रजनीकांत यांच्या ‘काला’ने फक्त प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत, तर घसघशीत कमाईही केली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये ‘काला’च्या कमाईचे उंचावणारे हे आकडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे.

चित्रपटाच्या या यशात महत्त्वाचा वाटा त्याच्या सकारात्मक प्रसिद्धीचा आहेच. पण, त्यासोबतच रजनीकांत यांची राजकीय कारकिर्द आणि त्यामुळे चित्रपटाला मिळालेलं एक वेगळंच वळण, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी झालेले वाद या साऱ्याचाही एका अर्थी फायदाच झाला आहे, असं म्हटलं जात आहे. चेन्नईमध्ये या चित्रपटाने चार दिवसांमध्ये ६.६४ कोटी रुपये कमवले आहेत. त्याशिवाय अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही चित्रपटाचं प्रदर्शन चांगलं सुरु असल्यामुळे कमाईच्या आकड्यांचा आलेख उंचावत आहे.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

तसं पाहिलं तर रजनीकांत, नाना पाटेकर, हुमा कुरेशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या काला या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २३० कोटींची कमाई केली होती. सॅटेलाइट आणि म्युझिक राइट्सची विक्री केल्यामुळे हे शक्य झालं होतं. तेव्हा आता राजकीय नाट्य, लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on June 11, 2018 5:31 pm

Web Title: rajinikanth film kaala movie box office collection day 4 club 100 cr