News Flash

सुपरस्टार रजनीकांतनी घेतली करोना लस; मुलगी म्हणाली, “करोनाला हरवूया…!”

मुलगी सौंदर्याने शेअर केला फोटो

देशभरात सुरू असलेलं करोनाचं थैमान अजुन संपलेलं नाही. अशा परिस्थितीत देशात एकीकडे लोक करोनाशी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे करोना लसीकरण सुद्धा तेजीत सुरूय. देशभरातील लोक करोना लस घेण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार देखील करोना लस घेताना दिसून येत आहेत. सलमान खान, रितेश देशमुख, धर्मेंद्र यांच्या पाठोपाठ आता ‘थलायवा’ अभिनेते रजनीकांत यांनी सुद्धा करोनाची दुसरी लस घेतली आहे.

अभिनेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सांगितली. सौंदर्याने तिच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सुपरस्टार रजनीकांत करोनाची लस घेताना दिसून येत आहेत. तसंच त्यांची मुलगी सौंदर्या त्यांच्या बाजूला उभी असलेली दिसून येत आहे. बाप-लेकीच्या जोडीने यावेळी करोना नियमांचे पालन करत चेहऱ्यावर मास्क देखील लावलेला दिसून आला. हा फोटो शेअर करताना सौंदर्याने एक कॅप्शनही लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “आपल्या थलायवांना करोनाची लस मिळाली आहे…चला सगळे मिळून करोनाला हरवूया…!”.

आतापर्यंत सुपरस्टार रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त बॉलीवूड स्टार्स सोनाक्षी सिन्हा, सैफ अली खान, रितेश देशमुख, सोनू सूद, अमिताभ बच्चन, मलाइका अरोरा यांनी देखील करोना लस घेतली आहे. बॉलिवूडधील अनेक मंडळींनी करोनाशी सामना केलाय. काही जण तर अजूनही करोनाशी झुंज देत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढाकार घेत करोना काळात लोकांच्या मदतीला धावत आहेत. काही जण करोना रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवत आहेत, तर काही जणांनी करोना रूग्णांना बेड्स मिळावेत म्हणून हेल्पलाइन सुरू केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 5:28 pm

Web Title: rajinikanth gets first shot of covid vaccine daughter soundarya posts pic prp 93
Next Stories
1 गंगा नदीतील मृतदेह पाहून परिणीती आणि फरहान संतापले; म्हणाले “राक्षस”
2 रेमडेसिवीर नाही तर इथं मिळतय रेमो डिसूझा इंजेक्शन, कोरिओग्राफरने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
3 मुलांसोबत का राहात नाही? नीतू कपूर यांनी सांगितले कारण
Just Now!
X