News Flash

Video : रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र; ‘पेट्टा’चा मोशन पोस्टर प्रदर्शित

'पेट्टा'च्या मोशन पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.

रजनीकांत, नवाजुद्दीन सिद्दीकी

‘थलायवा’ रजनीकांत ‘काला’ या चित्रपटानंतर चाहत्यांसाठी आणखी एक खास भेट घेऊन येत आहेत. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पेट्टा’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. ‘पेट्टा’च्या मोशन पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या चित्रपटात सेतूपती, नवाजुद्दीन, सिमरन, त्रिशा, सुब्बाराज आणि रविचंदक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

वाचा : ‘दुनिया गोल है’! सुबोध भावेच्या हस्ते लहानपणी मिळाला पुरस्कार, आता साकारतेय प्रेयसीची भूमिका 

जूनमध्येच या तामिळ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. ‘सन पिक्चर्स’ निर्मित या चित्रपटात नवाजुद्दीन रजनीकांतच्या विरोधात भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. या मोशन पोस्टरनंतर चित्रपटाची कथा आणि प्रदर्शनाची तारीख याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:03 pm

Web Title: rajinikanth nawazuddin siddiqui to work together first motion poster of film petta released
Next Stories
1 ‘दुनिया गोल है’! सुबोध भावेच्या हस्ते लहानपणी मिळाला पुरस्कार, आता साकारतेय प्रेयसीची भूमिका
2 #BadhaaiHo : आयुषमान खुरानावर बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?
3 #AshaBhosle : नजाकतीच्या सुरांची स्वर’आशा’..
Just Now!
X