27 February 2021

News Flash

Rajinikanth’s political debut: रजनीकांतच्या अॅपवर ३ लाख लोकांनी केली नोंदणी

५०,००० अनधिकृत रजनीकांत फॅन क्लब आहेत

रजनीकांत

वर्षाचा शेवट दणक्यात करावा असं साऱ्यांनाच वाटत असतं. पण खऱ्या अर्थाने वर्षाचा शेवट दणक्यात करणं काय असतं हे सुपरस्टार रजनीकांत यांनी दाखवून दिलं. ३१ डिसेंबरला त्यांनी राजकारणात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चांना हिरवा कंदील दिला. ६७ वर्षीय ‘थलायवा’ यांनी सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाबद्दल अधिकृत माहितीही दिली. जगभरातील आपल्या चाहत्यांना एकवटण्यासाठी त्यांनी एक वेबसाइटही तयार केली. ‘रजनीमंद्रम डॉट ओआरजी’ (Rajinimandram.org) या वेबसाइटवर नोंदणी करुन प्रत्येकजण रजनीकांत यांना पाठिंबा दर्शवू शकतो.

रजनी यांनी या वेबसाइटची आणि अॅपची घोषणा करताच अवघ्या काही तासांमध्येच तीन लाख लोकांनी या वेबसाइटवर नोंदणी केली. हे तर झालं अधिकृत वेबसाइटबद्दल. पण, याव्यतिरीक्त सुमारे ५०,००० अनधिकृत रजनीकांत फॅन क्लब आहेत ज्यांच्यावरही रजनी यांचे चाहते फार सक्रीय झाले आहेत. अॅनड्रॉइड मोबाइलमध्ये रजनीकांत यांच्या पार्टीचे अधिकृत अॅप्लिकेशन आहे. या अॅपवरुनही त्यांचे समर्थक त्यांना पाठिंबा दर्शवू शकतात.

व्हिडिओमार्फत चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत म्हणाले की, ‘तामिळनाडूमध्ये उत्तम सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणा, अथक प्रयत्न आणि सतत सुधारत राहण्याची आवश्यकता आहे. याच गोष्टींसाठी मी ‘रजनीमंद्रम डॉट ओआरजी’ (Rajinimandram.org) ची सुरूवात केली. यामुळे अनअधिकृत अॅप आणि वेबसाइट्सना आळा बसेल आणि माझ्या सर्व चाहत्यांना, समर्थकांना एकत्र येता येईल. कोणीही या वेबसाइटवर नोंदणी करु शकता. चला तर मग सर्व एकत्र येऊन तामिळनाडूमध्ये एक चांगलं सरकार घडवण्याचा प्रयत्न करु.’

‘रजनीमंद्रम’ हेच रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव असणार का, याबद्दल अजून काहीही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. पण येत्या काही दिवसांमध्ये यावरूनही पडदा उठेल. पोंगलदरम्यान रजनीकांत त्यांच्या पक्षाचे नाव जाहीर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 10:58 am

Web Title: rajinikanth political debut over 3 lakh people register on his new portal rajinimandram org
Next Stories
1 PHOTOS : ..अन् मनिषावर खिळल्या सर्वांच्या नजरा
2 ‘मी क्रिकेटपटू किंवा श्रीमंत व्यवसायिकाशी लग्न करणार नाही’
3 TOP 10 NEWS : रणबीर-माहिराच्या ब्रेकअपपासून प्रतिक बब्बरच्या साखरपुड्यापर्यंत..
Just Now!
X