सुपरस्टार रजनीकांत यांचा संभाव्य राजकारण प्रवेश यावर अनेक वेळा चर्चा होताना दिसून येते. अशीच चर्चा सध्या रंगत असून, स्वत: रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘कोचादैयान’ चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमादरम्यान वार्ताहरांनी आपण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी किंवा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरिवाल यांना येत्या लोकसभा निवडणुकीत सहाय्य करणार का, असा प्रश्न विचारला असता, अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘कोचादैयान’ चित्रपटाच्या वेगळेपणाविषयी बोलताना ते म्हणाले, हा चित्रपट ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करून बनविण्यात आलेला देशातील पहिलाच चित्रपट आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 1:15 am