News Flash

रजनीकांतने चक्क चाहत्याचे धरले पाय, कारण…

सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांचे असंख्य चाहते असल्याचे पाहायला मिळते. हेच चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी किंवा त्याला गिफ्ट देण्यासाठी कधी काय करतील याचा नेम नसतो. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतला त्याचा दिव्यांग चाहता भेटला आहे. दरम्यान या चाहत्याने रजनीकांतला गिफ्टही दिले आहे.

केरळमधील पलक्कड येथे राहणारा २१ वर्षीय प्रणव रजनीकांतला भेटण्यासाठी त्याच्या चेन्नई येथील निवासस्थळी पोहोचला होता. प्रवण हा इतर चाहत्यांप्रमाणे सामान्य नाही. त्याला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे रजनीकांतने या दिव्यांग चाहत्याला भेटल्यावर हात मिळवण्याऐवजी पाय धरुन स्वागत केले आहे. प्रणव दोन्ही पायांच्या जोरावर अनेक कामे करतो. त्याने रजनीकांतची २० मिनिटे भेट घेतली. दरम्यान त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रवणने त्याच्या पायाने रजनीकांतचे चित्र काढले आहे. त्याने ते रजनीकांतला भेटल्यावर गिफ्ट दिले. तसेच त्याने पायाने रजनीकांतसोबतचा सेल्फी काढला आहे. काही दिवसांपूर्वी प्रणवने केरळचे मुख्यमंत्री पिन्नरई विजयन यांच्यासोबत झालेल्या मुलाखती दरम्यान रजनीकांतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पिन्नरई यांनी प्रणवची ही इच्छा पूर्ण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:22 pm

Web Title: rajinikanth touching a differently abled fans feet is winning the internet avb 95
Next Stories
1 ‘जॉनी डेपने माझ्या वडिलांना दिली ठार मारण्याची धमकी’; अभिनेत्रीने केला आरोप
2 Video : “हे होतं आमचं अखेरचं बोलणं”, दीपिकाने केला श्रीदेवींच्या ‘त्या’ मेसेजचा खुलासा
3 मुलांना ओळख मिळावी म्हणून केलं लग्न – अर्चना पुरण सिंग
Just Now!
X