आगामी लोकसभा निवडणुकीतून सुपरस्टार रजनीकांत यांनी माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्यासह त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारमचाही निवडणुकीत सहभाग नसेल. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत माझा किंवा माझ्या पक्षाचा कोणालाही पाठिंबा नसणार नाही. चाहते आणि कार्यतर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी न करण्याता सल्लाही त्यांनी दिला. लोकसभा ऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचं लक्ष असेल असे रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

अभिनेते रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकारणाच एन्ट्री घेतली होती. ‘रजनी मक्कल मन्दरम’ असे रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव आहे.