29 September 2020

News Flash

रजनीकांतच्या ‘२.०’ चित्रपटाची दोन दिवसांत शंभर कोटींची कमाई

रजनीकांत ‘चिट्टी’ या नव्या चित्रपटात आपल्या त्याच स्टाइल आणि झोकात पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे.

'2.0'

रजनीकांत आणि अक्षयकुमार या दोघांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘२.०’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा सिक्वल ‘२.०’ नावाने प्रदर्शित झाला आहे. एस. शंकर दिग्दर्शित ‘रोबोट’ या चित्रपटाने आठ वर्षांपूर्वी विक्रमी कमाईचा इतिहास रचला होता. आताही भव्यदिव्य चित्रपट, मोठय़ा प्रमाणावर ‘व्हीएफ एक्स’चा वापर केलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत शंभर कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाला अजूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

रजनीकांत ‘चिट्टी’ या नव्या चित्रपटात आपल्या त्याच स्टाइल आणि झोकात पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘चिट्टी’ या रोबोटची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात अक्षयकुमारने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका केली आहे. या चित्रपटासाठी मोठय़ा प्रमाणावर ‘व्हीएफएक्स’चा वापर करावा लागल्याने ५४३ कोटी रुपये एवढा अवाढव्य खर्च या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:13 am

Web Title: rajinikanths film 2 0 earns 100 crores in two days
Next Stories
1 वेबवाला : व्यापार, साम्राज्यविस्तार आणि स्वातंत्र्य
2 ‘ही’ व्यक्ती करणार प्रियांकाचं कन्यादान
3 अखेर प्रियांका झाली विदेशी सून!
Just Now!
X