छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘रोडीज’ फेम राजीव लक्ष्मणने नुकताच अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर काही वेळातच राजीवने हा फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केला आणि एक नवी पोस्ट शेअर केली.
राजीव लक्ष्मणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो एका पार्टीमधील असून राजीवने तो शेअर करत ‘माय गर्ल’ असे कॅप्शन दिले होते. या फोटोमुळे राजीवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केला.
आता राजीवने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘मी माझ्या आधीच्या पोस्टमध्ये चुकीचा शब्दप्रयोग करुन विनाकारण संकट ओढावून घेतलं होतं. रिया ही माझी जुनी मैत्रीण आहे आणि तिला पुन्हा भेटून मला आनंद झाला होता’ असे म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिले जात होते. त्यानंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आले. यात रिया आणि तिच्या भावाचे नाव उघड झाले. सध्या रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. पण त्यानंतर रिया सोशल मीडियावर चर्चेत होती. आता तिने एका पार्टीला हजेरी लावल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 1:26 pm