‘राजकमल स्टुडिओ’ म्हटलं की, सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर नाव येत ते चित्रपती व्ही. शांताराम यांचं! आज व्ही’ शांताराम यांची ११६ वी जयंती असून यानिमित्तानं राजकमलचा अमृतमहोत्सवी सोहळा देखील साजरा होणार आहे.

राजकमल हा ब्रिटीशकाळात मुंबईत सुरु झालेला सर्वात जुना स्टुडिओ आहे. आज मुंबईत जुन्या स्टुडिओपैकी वांद्र्याचा मेहबूब, अंधेरीचा कमाल अमरोही स्टुडिओ (कमालीस्तान), साकी नाक्याजवळचा चांदिवली, गोरेगावचा फिल्मीस्तान, चेंबुरचा आर के, ट्रॉम्बेचा एसेल हे स्टुडिओ कार्यरत आहेत. यापैकी आरके स्टुडिओच्या मुख्य भागाला अलिकडेच दुर्देवाने आग लागली. तर गोरेगावची शासनाची चित्रनगरी १९७८ साली कार्यरत झाली. जुन्या स्टुडिओपैकी दादरचे रणजीत, रुपतारा, तसेच ग्रँटरोडचा ज्योती, अंबोलीचा फिल्मालय, अंधेरीचे नटराज आणि मोहन या स्टुडिओचे अस्तित्व काळाच्या ओघात नाहीसे झाले.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
ss-rajamouli-earthquake
जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यातून ‘असे’ बचावले एसएस राजामौली; दिग्दर्शकाच्या मुलाने सांगितला किस्सा

व्ही. शांताराम प्रभात चित्र फिल्म कंपनीमधून बाहेर पडल्यावर त्यांनी परेल येथे महात्मा गांधी रुग्णालयाजवळ राजकमल स्टुडिओची उभारणी केली. वडिल राजाराम व आई कमल या दोघांच्या नावातून व्ही. शांताराम यांनी स्टु़डिओला ‘राजकमल’ असे नाव दिले. राजकमलने निर्माण केलेला पहिला चित्रपट ‘शकुंतला’ हा असून त्याने गिरगावातील स्वस्तिक चित्रपटगृहात १०४ आठवडे मुक्काम केला. १९६० सालापर्यंत प्रामुख्याने येथे राजकमलच्याच चित्रपटांचे चित्रिकरण होत असे. मात्र, त्यानंतर इतरही निर्मिती संस्थांना येथे चित्रिकरणाची संधी मिळाली. राजकमलने ‘दो आँखें बारह हाथ’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘सेहरा’, ‘गीत गाया पथरों ने’, ‘नवरंग’, ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’, ‘चानी’ इत्यादी हिंदी तसेच ‘पिंजरा’, ‘झुंज’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, इत्यादी मराठी चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी पिंजराचे चित्रिकरण व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरातील शांतकिरण स्टुडिओत केले. राजकमलची काही वैशिष्ट्ये आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वाचनालय. यामध्ये हॉलिवूड, बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी, दक्षिणेकडची तसेच बंगालची चित्रपटसृष्टी यावर भरपूर प्रमाणात पुस्तके, छायाचित्रे, बुकलेट उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सत्यजित रे, राज कपूर, यश चोप्रा, तरुण मुजुमदार हे या वाचनालयाचे कायमस्वरुपी सभासद म्हणून ओळखले गेले. या वाचनालयाचा फायदा अनेक निर्माता दिग्दर्शक, पटकथाकार यांना झाला. राजकमलमधील मिनी थिअटरमध्ये नवीन चित्रपटाचे डबिंग, रिरेकॉर्डिंग, मिक्सिंग इत्यादी तांत्रिक कामे आज देखील सुरु आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सध्याचा बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटातील तांत्रिक काम याच स्टुडिओमध्ये पार पडले.

या स्टुडिओच्या वास्तुत प्रवेश करताना आजही व्ही. शांताराम यांचे अस्तित्व जाणवते. त्यांची करडी शिस्त व वक्तशीरपणा याच्या आठवणी आजही सांगितल्या जातात. स्वत: व्ही. शांताराम सकाळी सव्वा नऊ वाजता स्टुडिओत येत. आपल्या उपस्थितीचे कार्डपंच करत. त्यांच्या वक्तशीरपणाची आठवण करुन देणारे ते घड्याळ अजूनही त्याच जागेवर आहे. व्ही. शांताराम यांचे पूत्र किरण शांताराम यांनी आपल्या वडिलांसोबत याच ठिकाणी आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना देखील हा कार्ड पंचचा नियम लागू होता. जेव्हा किरणजी उशीरा येत तेव्हा त्यांना आपल्या वडिलांचे बोल ऐकावे लागत. शिवाय वेतनातून कपातही केली जाई. आज किरण शांताराम या स्टुडिओचा सर्व डोलारा सांभाळत आहेत. जितेंद्रसाठी राजकमल स्टुडिओ खास आहे. त्याने ‘गीत गाया पथरों ने’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. याच स्टुडिओतून कारकिर्दीला सुरुवात केली हे आजही तो अभिमानाने सांगतो.
अन्य निर्मिती संस्थांनी या स्टुडिओत चित्रिकरणाला सुरुवात केली याच्याही काही खास आठवणी आहेत. बी. आर. चोप्रा निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तफाक’ या चित्रपटासाठी सलग दोन महिने सेट लावला होता. राजेश खन्ना आणि नंदा यांनी त्या चित्रिकरणात भाग घेतला. १९७३ साली यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मची स्थापना केली. तेव्हा व्ही. शांताराम यांनीच त्यांना राजकमलमध्ये कार्यालयासाठी जागा दिली होती. राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी याची भूमिका असणाऱ्या ‘दाग’ चे चित्रिकरण याच स्टुडिओत झाले. यानंतर यश चोप्रा यांनी ‘दिवार’पासून ‘लम्हे’ पर्यंत आपल्या सर्व चित्रपटांचे चित्रिकरण याच स्टुडिओत केले. याशिवाय असित सेन दिग्दर्शित सफर, हेमंत कुमार निर्मित ‘बीस साल बाद’ इत्यादी चित्रपट देखील याच ठिकाणी चित्रित झाले. तुम्हाला राहुल रवेल दिग्दर्शित ‘अर्जुन’ या चित्रपटातील सनी देओलने हातात छत्री घेऊन भरपावसात हत्या घडवल्याचा प्रसंग याच स्टुडिओत चित्रित करण्यात आला होता. ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम याच ठिकाणी झाले. लता मंगेशकर निर्मित व गुलजार दिग्दर्शित ‘लेकीन’ चित्रपटाचा मुहूर्त याच वास्तूत झाला.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

६० च्या दशकात प्लाझा चित्रपटगृहातील स्टॉलमध्ये लाकडी बाकडी आणि अप्पर स्टॉलला खुर्च्या अशी बैठक व्यवस्था असायची. त्या काळातील जुन्या बैठक व्यवस्थेची दर्शन घडवणारी दोन बाकडी आजही राजकमलच्या मुख्य इमारतीबाहेर पाहायला मिळतात. तर ‘अशी ही बनवाबनवी’चा रौप्य महोत्सवी सोहळा याच वास्तूत व्ही. शांताराम यांच्या अशिर्वादाने साजरा झाला. हे राजकमल स्टुडिओतील खास आकर्षण आणि वैशिष्ट्यापैकी एक आहे.