25 November 2020

News Flash

‘छलांग’ प्रेमाची कि स्पर्धेची; पाहा, राजकुमार रावच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

पाहा, राजकुमार राव- नुशरतच्या 'छलांग'चा ट्रेलर

गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी छलांग या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार मुख्य भूमिका साकारत असून पहिल्यांदाच तो नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्त्री या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतर राजकुमारचा आगामी चित्रपट कसा असेल याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यातच त्याच्या छलांग या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित छलांग या चित्रपटात राजकुमार मुख्य भूमिका साकारत असून अभिनेत्री नुशरत भरुचा त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरवरु या दोघांची भन्नाट लव्हस्टोरी उलगडली जाणार असल्याचं दिसून येत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मोंटू( राजकुमार राव) हा एका शाळेमध्ये पीटी शिक्षक असतो. तर त्याच शाळेमध्ये निलिमा( नुशरत भारुचा) कम्प्युंटर शिक्षिका म्हणून रुजू होते. निलिमाला पाहिल्यानंतर मोंटू तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मोंटू प्रेमाची कबुली देण्यापूर्वीच सिंग सरांची शाळेत एण्ट्री होती आणि सगळं चित्र बदलून जातं. विशेष म्हणजे या चित्रपटात विनोदासोबतच एक प्रेरणादायी समाजिक संदेशही देण्यात येणार असल्याचं एकंदरीत या ट्रेलरवरुन दिसून येत आहे.

आणखी वाचा- ‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:22 pm

Web Title: rajkumar rao and nushrat bharucha film chhalaang trailer released ssj 93
Next Stories
1 “माझ्यासोबत फसवणूक झाली”; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
2 दिग्दर्शकाच्या ‘त्या’ वागणुकीनंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली; रुबीना दिलैकने सांगितला धक्कादायक अनुभव
3 ‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका
Just Now!
X