21 January 2021

News Flash

VIDEO : लॉकडाउनमध्ये राजकुमार राव कापतोय प्रेयसीचे केस

राजकुमारचा केस कापतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या अफलातुन अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो त्याच्या प्रेयसीमुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क अभिनेत्री पत्रलेखाचे केस कापताना दिसतोय.

लॉकडाउनमुळे घरात थांबलेला राजकुमार आपल्या प्रेयसीचे म्हणजेच पत्रलेखाचे केस कापतोय. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आठ लाखांपेक्षा अधिक नेचकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे.

‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार पत्रलेखाबाबत म्हणाला होता, “आमच्याबद्दल अनेक गोष्टी मला वाचायला मिळतात. आमचे लग्न झाले असेही अनेकांना वाटते. मात्र मला हेच सांगायचे आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये खूश आहोत. जिमबाहेर आम्ही कशाप्रकारे भांडत होतो अशा अनेक बातम्या वाचल्या होत्या. मात्र त्यांना कधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले नाही”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 5:54 pm

Web Title: rajkummar rao cut girlfriend patralekhaas hair mppg 94
Next Stories
1 फराह खानला डॉक्टरांनी दिला क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला; जाणून घ्या कारण…
2 लॉकडाउनच्या काळात सेहवाग पाहतोय ‘ही’ पौराणिक मालिका
3 Video : ‘.. तो जिंदा हो तुम’; कवितेतून फरहान अख्तरने दिला संदेश
Just Now!
X