News Flash

‘मेड इन चायना’मध्ये राजकुमार रावसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

'मेड इन चायना' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

राजकुमार राव

बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता राजकुमार राव सध्या साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘स्त्री’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर१०० कोटींचा गल्ला जमविला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटाकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे.

राजकुमार लवकरच ‘मेड इन चायना’ या चित्रपटात झळकणार असून त्याने या चित्रपटाचा फोटो ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री मौनी रॉयदेखील दिसून येत आहे. विशेष म्हणजे ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीच्या पदरात आणखी एक चित्रपट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मौनीचे चाहते पुन्हा एकदा तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.

Next Stories
1 Video : ‘या’ गाण्यातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत झळकणार स्पृहाचा पती
2 Happy Birthday Priya : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?
3 Happy Birthday shabana azmi : जाणून घ्या, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविषयी
Just Now!
X