News Flash

दाक्षिणात्य ‘हिट’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार राजकुमार राव

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक येणे ही नवी गोष्ट नाही. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकेन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आता तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘हिट’चा हिंदी रिमेक येणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबती उत्सुकता पाहायला मिळते.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. ‘तेलुगू चित्रपट हिटच्या हिंदी रिमेकमध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शैलेश कोलानू यांनी तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ते चित्रपटाच्या रिमेकचे देखील दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती दिल राजू आणि कुलदीप राठोर करणार आहेत’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तेलुगू ‘हिट’ चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे. जो एका बेपत्ता महिलेच्या शोधात असतो. हा चित्रपट दाक्षिणेकडील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असल्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे पाहायला मिळते.

चित्रपटात काम करण्याविषयी राजकुमारे वक्तव्य केले. ‘जेव्हा मी हिट चित्रपट पाहिला तेव्हा त्याच्या हिंदी रिमेकसाठी होकार कळवला. ही एक आकर्षक कथा आहे. सध्याच्या परिस्थितीशी मिळतीजुळती आहे. मी एक अभिनेता म्हणून नेहमी अशाच भूमिकांच्या शोधात असतो. पण मला अशा भूमिका मिळाल्या नाहीत. हिट चित्रपटामुळे मला ती संधी मिळणार आहे’ असे राजकुमार म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 2:23 pm

Web Title: rajkummar rao in hindi remake of telugu superhit movie hit avb 95
Next Stories
1 ‘जीव झाला येडापिसा’च्या चित्रीकरणाला सुरुवात; ‘या’ दिवशी नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
2 शिल्पा शेट्टी जपानमध्ये ‘बाजीगर’मधील गाण्यावर करतेय डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा
Just Now!
X