17 January 2021

News Flash

राजकुमार-नुशरतने DDLJ मधील गाणं केलं रिक्रिएट; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

नुशरतने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शाहरुख-काजोलची जबरदस्त केमिस्ट्री आणि अफलातून गाणी यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट आज पुन्हा एकदा अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री नुशरत भरुचा यांच्यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तुझे देखा तो ये जाना समन हे गाणं त्यांनी रिक्रिएट केलं आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका

नुशरतने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती राजकुमारसोबत नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडीओतील लक्षवेधी बाब म्हणजे हे गाणं ज्या लोकेशनवर शूट करण्यात आलं होतं हुबेहुब तशाच ठिकाणी अन् त्याच शैलीत या गाण्याचं रिक्रिएशन त्यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडयावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – VIDEO: कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत

अवश्य पाहा – पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या

मुळ गाण्याचं चित्रीकरण स्वित्झलँडमध्ये करण्यात आलं होतं. हे गाणं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलं होतं. या गाण्याचं दिग्दर्शन जतिन-ललित यांनी केलं होतं. २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे. आजही अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये या गाण्याची हमखास फरमाईश केली जाते. या पार्श्वभूमीवर राजकुमार आणि नुशरतचा हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:16 pm

Web Title: rajkummar rao nushrratt bharuccha dilwale dulhania le jayenge tujhe dekha to yeh jana sanam mppg 94
Next Stories
1 “या चित्रपटामुळे करिअर संपलं”; ट्रकवरील पोस्टर पाहून ट्विंकल संतापली
2 KBC 12: ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
3 ‘बिग बींमुळे नैराश्यात गेलो होतो’; सुदेश भोसले यांनी सांगितला करिअरमधील रंजक किस्सा
Just Now!
X