24 January 2020

News Flash

तुला पाहते रे : या दिवशी होणार राजनंदिनीची एण्ट्री?

शिल्पा तुळस्कर यांनी मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली असून यादिवशी त्यांची एण्ट्री होणार आहे.

तुला पाहते रे

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या मालिकेत येणारे नवनवीन वळण प्रेक्षकांना नेहमीच गुंतवून ठेवतात. इशा-विक्रांतचं लग्न असो किंवा विक्रांतच्या स्वभावाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आणणं असो, निर्मात्यांनी प्रत्येक एपिसोडमध्ये नाविन्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. हे ट्विस्ट म्हणजे मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री.

मालिकेच्या शीर्षकगीतातच राजनंदिनीची झलक पाहायला मिळते. पण आतापर्यंत ती मालिकेत दिसली नव्हती. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी मालिकेसाठी शूटिंगला सुरुवात केली असून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, २४ एप्रिलच्या एपिसोडद्वारे त्या प्रेक्षकांना भेटणार आहेत.

मालिकेत सुरू असलेल्या कथेप्रमाणे राजनंदिनीचा मृत्यू झाला असून इशाच्या रुपात तिचा पुनर्जन्म झाला आहे. त्यामुळे राजनंदिनीची भूमिका फ्लॅशबॅकच्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहे. राजनंदिनीचं रहस्य नेमकं काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंगल्यातल्या बंद खोलीत काय रहस्य दडलं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजनंदिनी आल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

First Published on April 23, 2019 4:03 pm

Web Title: rajnandini to make an entry on 24 april in tula pahate re
Next Stories
1 ‘तेरे नाम’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 नागराज मंजुळेंचे सहपरिवार ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ मतदान
3 या बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींवर मधूर भांडारकर आणणार चित्रपट?
Just Now!
X