आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेता राजपाल यादवचा आज 50 वा वाढदिवस आहे. राजपाल यादवने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांना मनोसोक्त हसवलं आहे. उत्तम कलाकार असलेला राजपाल यादवची अगदी साध्या पद्धतीने त्याच्या कुटुंबासोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याची ईच्छा आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत राजपालने त्याच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे. ” जर लोकांना तुम्हाला भेटायची ईच्छा असेल किंवा तुमच्याशी बोलायची ईच्छा असेल तर याचा अर्थ अद्याप तुम्ही योग्य आहात. मी 2021 मध्ये माझ्या आयुष्याचं अर्धशतक पूर्ण करतोय. मात्र आतापर्यंतच्या प्रवसात मला अनेक खडतर परिस्थितीचा सामाना करावा लागला आहे. 2000 ते 2010 या दहा वर्षात मला 100 सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. त्यामुळे मला वाटतंय माझा पुनर्जन्म झाला आहे आणि मी आता अधिक ध्य़ेय गाठण्याकडे वाटचाल करतोय.” असं राजपाल त्याच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हणाला.
1999 सालात आलेल्या अजय देवगणच्या ‘शूल’ या सिनेमातून राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. दोन दशकांच्या कारकीर्दीत राजपालने विविध भूमिका साकारल्या आहेत. राजपालने आतापर्यंत खास करून विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हंगामा, गरम मसाला, मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, भूलभुलैया, पार्टनर, जुडवा-२ अशा अनेक सिनेमांमधून त्याने कॉमेडी भूमिका केल्या आहेत. तर जंगल, डरना मना है, मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू या प्रकराच्या काही सिनेमांमधून त्याने कॉमेडी न करता काहिशा हटके भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
राजपाल यादवसाठी चार्ली चॅपलिन हा प्रेरणास्त्रोत आहे. असं असंल तरी आपण कधी चार्ली चॅपलिनला कॉपी करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं तो म्हणतो. “चार्ली चॅपलिन माझा मित्र आहे आणि मी त्याच्याशी तासंतास बोलू शकतो. कलेसारखा मोठा मित्र नाही. जर माझं दु: ख एखाद्याच्या आनंदात बदलू शकतं तर मला त्याचा नक्कीच आनंद आहे” असं राजपाल म्हणाला.
काही वेगळ्या भूमिका करूनही कायम विनोदी कलाकार म्हणून पाहिलं गेलं का? या प्रश्वावर उत्तर देताना तो म्हणाला, “वास्तविक जीवनात मी एक अतिशय गंभीर माणूस आहे. मला निरिक्षण करायला आवडतं. जो आयुष्यात समाधानी आहे तो मजेशीर असू शकतो. जेव्हा आपल्याला 500 भूमिका साकारायला मिळतात तेव्हा तूम्ही त्याचं वर्गिकरण करू शकत नाही.
राजपाल यादव म्हणाला की, जेव्हा त्याने अभिनयाला सुरुवात केली होती तेव्हा मुख्य अभिनेता आणि कॉमेडीअन अशा वेगवेगळ्या वर्गवारी होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्व काही पात्रांबद्दल आहे. त्यामुळे नव्या पिढीला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. असंही खऱ्या कलाकरासाठी प्रेक्षकांचं मनोरंजंन करण महत्वाचं असतं. जे आम्ही पडद्यावर साकारतो ते आमचं खरं आयुष्य नसतं. त्यामुळे तुम्ही मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका किंवा कॉमेडी भूमिका साकारण्याने काही फरक पडत नाही. एकंदरच सध्या करमणुकीचं युग आहे.”
अगदी शेवटी राजपाल यादवला विचारलेल्या प्रश्वावर त्यानं लक्षवेधी उत्तर दिलंय. सिनेसृष्टीत तुझा मित्र कोण? असा सवाल त्याला मुलाखतीत विचारण्यात आला यावर त्याने “माझा मित्र कोण आहे हे मला ठाऊक नाही. पण मला माहित आहे की माझा शत्रू नाही.” असं उत्तर दिलं.
काही दिवसांपूर्वीच राजपाल यादवला उत्तर प्रदेश सरकारनं उत्तर प्रदेश गौरव सन्मान प्रदान केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 4:20 pm