24 October 2020

News Flash

राजपाल यादवच्या घरी चिमुकलीचं आगमन

राजपालने सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली.

राजपाल यादव

प्रख्यात विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादवला कन्यारत्न झाले आहे. राजपालने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली. राजपाल यादव सोशल मीडियावर सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत केला आहे.

राजपालने ट्विटरवर त्याच्या मोठ्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजपालची मोठी मुलगी दिसत असून तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे. ज्यावर बिग सिस्टर असं लिहीलं आहे.

‘नवरात्रीचा उत्साह वाढविण्यासाठी माझ्या घरी खऱ्याखुऱ्या देवीचं आगमन झालं आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माझ्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे आता माझी लाडकी लेक हनी यादव ताई झाली आहे’, असं कॅप्शन राजपालने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, लेकीच्या आगमनामुळे यादव कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राजपाल चंदीगढ अमृतसर चंदीगढ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 10:14 am

Web Title: rajpal yadav wife radha yadav blessed with daughter
Next Stories
1 #Happy Birthday Amitabh Bachchan : कलाविश्वातून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव
2 #MeToo : सुहेल सेठवरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप
3 #Happy Birthday Amitabh Bachchan: ‘बिग बीं’चं खरं नाव माहित आहे का ?
Just Now!
X