अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’ शोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधईल खेळामुळे देखील शमिता चर्चेत आहे. अनेक प्रेक्षकांना शमिताचा परफॉर्मन्स आवडतोय. तर शमिता आणि राकेश बापटमधील केमिस्ट्री चर्चेत आहेत. नुकताच शमिता आण राकेश बापटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत राकेश शमिताला किस करताना दिसून येतोय.

शमिता शेट्टी आणि राकेश बापटमध्ये वाढलेली मैत्री शोमध्ये दिसून येतेय. राकेश बापट शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसून आलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. यातच आत ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील राकेश आणि शमितचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत शमिता बेडवर झोपलेली दिसतेय. तर राकेश बापट शमिताच्या हातावर किस करताना दिसतोय. हा व्हिडीओ व्हाहरल होताच नेटकऱ्यांमध्ये आता शमिता आणि राकेशच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

हे देखील वाचा: “बायको परवडत नाही”, आमिर खानचा भाऊ फैजलचं मजेशीर उत्तर म्हणाला…

हे देखील वाचा: “रणवीर सिंह बाबा झाला”; चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती च्रोपाने दिलं ‘हे’ उत्तर

‘बिग बॉस’ शो म्हंटलं की वाद, भांडणं आणि ड्रामा यासोबत मैत्री आणि नात्यांच्या चर्चा कायम रंगताना दिसतात. यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता आणि राकेश बापटच्या नात्यावर प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झालीय.

राकेश बापटने २००१ सालामध्ये आलेल्या ‘तुम बिन’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. याशिवाया राकेशने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलंय.