दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा काही दिवसांपासून त्यांच्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच ‘द स्ट्रेंजर इन मिरर’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट वेळेत पूर्ण होण्याचे श्रेय त्यांनी आमिर खानला दिले आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पुस्तकात या विषयी सांगितले आहे. “आमिर सगळ्यांच गोष्टींचा विचार करणारा माणूस आहे आणि काम करताना काय योग्य आणि अयोग्य आहे हे तो समजून घेतो. कधी कधी आणखी १० दिवस चित्रीकरण करूया असा निर्णय घेणे आमिरमुळे सोपे होते कारण तो त्यासाठी तयार असतो. एवढंच नाही तर अशा वेळी कोणत्या ही सीनचे चित्रीकरण असो, तो कोणाचा ही सीन असला तरी त्याला गर्व नसतो. जर तो सीन दुसऱ्या कोणाचा असेल तर आमिर शांतपणे पाठी बसून राहतो. त्या सीनला पर्फेक्ट बनवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो. आमिरची सिनेमॅटिकचीजी समज आहे ती सर्वोत्तम आहे. आमिरमुळे ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट वेळेत पूर्ण झाला होता,” असे राकेश ओमप्रकाश त्यांच्या पुस्तकात म्हणाले.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

ते पुढे म्हणाले, “आमिरने चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक क्लॉज जोडला होता. ज्यात लिहिले होते की जर चित्रपट वेळेत पूर्ण झाला नाही तर आमिर त्याची फी दुप्पट करेल. आमिरने हा क्लॉज जोडल्यामुळे मी पहिल्यांदा वेळेत चित्रपट संपवला होता. आमिर उदाहरण देत म्हणाला होता की जर माझी फी ही ४ कोटी रुपये आहे आणि तुम्ही वेळेत चित्रपट पूर्ण करू शकले नाही, तर तुम्हाला माझ्या फीच्या दुप्पट म्हणजेच ८ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यावेळी मी ८ कोटी रुपये पाहिले देखील नव्हते.” तर, ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट हा २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘त्या’ सीनवर कौतुकांचा वर्षाव

राकेश ओमप्रकाश मेहरा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मिर्जा’, ‘दिल्ली-६’ आणि ‘तूफान’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.