News Flash

राकेश रोशन यांनी घेतली करोना लस; शेअर केला फोटो

फोटो देखील शेअर केला आहे.

देशात १ मार्च पासून करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. आता बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी करोनाची लस घेतली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राकेश रोशन यांनी ट्विटरच्या माध्यमातून करोनाची लस घेतली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट करत ‘करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे’ असे म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी त्यांचा लस घेतनाचा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी अभिनेते कमल हासन, सतीश शाह आणि इतर कलाकारांनी करोना लस घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी राकेश रोशन आणि त्यांची पत्नी पिंकी रोशन यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह येताच त्यांच्यासोबत त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते.

राकेश रोशल लवकरच मुलगा हृतिक रोशच्या ‘क्रिश’ या चित्रपटाचा पुढचा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. क्रिश ४ या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन करणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. क्रिश ३ हा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना रणौत आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 6:19 pm

Web Title: rakesh roshan had taken dose of covishield and share image avb 95
Next Stories
1 ओळखा पाहू कोण आहे हा चिमुकला?, सर्वांचा फेव्हरेट चॉकलेट हिरो
2 ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं फिमेल व्हर्जन लवकरच येणार… !!
3 कंगणावर तुटून पडले दीपिकाचे चाहते; जीन्सवरुन सुरु झालेल्या वादातून ‘सोशल राडा’
Just Now!
X