News Flash

“मला आणि कुटुंबाला करोना होऊच शकत नाही कारण…”, राखी सावंतचा अजब दावा

राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राखीला आणि तिच्या कुटुंबाला करोनाची लागण होऊ शकतं नाही यादा दावा तिने केला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एका कॉफी शॉपच्या बाहेर राखी होती. यावेळी फोटोग्राफर्सशी करोना व्हॅक्सिनच्या कमतरतेवर राखीने चर्चा केली. “देशात करोना व्हॅक्सिनची कमतरता आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की मला मिळणारी लस ही गरजूंना मिळाली पाहिजे. मला करोना होऊ शकतं नाही, कारण माझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे. त्यामुळेच मला आणि माझ्या कुटुंबाला करोनाची लागण होणार नाही,” असं राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी पुढे म्हणाली, “मी माझ्या सगळ्या वाईट सवयी सोडल्या आहेत. फक्त थोडा राग येतो मला आणि तेही ठीक होईल.” राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे तर तू रक्त दान कर.” दुसरा नेटकरी म्हणाला, “राखी खूप गोंडस आहे.” अशा कमेंट करत कोणी राखीला बालिश म्हटलं आहे तर कोणी राखीला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या पतीमुळे चर्चेत आहे. रितेश असे राखीच्या पतीचे नाव आहे. तिच्या पतीला अजून कोणी पाहिले नाही. त्यामुळे ती खोटं बोलत असल्याचे आरोप अनेकांनी तिच्यावर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:12 pm

Web Title: rakhi sawant claims she will not contract covid 19 because she has jesus holy blood in her body dcp 98
Next Stories
1 निधनाच्या अफवांवर लकी अली यांची पोस्ट, म्हणाले…
2 ‘हाय गर्मी’वर नोरा फतेहीने धरला लावणीचा ठेका, सोशल मीडियावर डान्स तुफान व्हायरल
3 डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X