14 October 2019

News Flash

राखी सावंत म्हणते, जर मला ट्रोल केलं तर…

राखीला 'बेस्ट आयटम नंबर डान्सर' यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

राखी सावंत

आयटम गर्ल राखी सावंत तिच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. राखीने केलेल्या प्रत्येक विधानानंतर तिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर अनेक वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावं लागलं. दरवेळेप्रमाणे आताही राखीवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यावेळी कोणत्याही वक्तव्यामुळे नाही तर तिला चक्क पुरस्कार मिळाल्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

राखी सावंतला नुकतंच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये राखीला ‘बेस्ट आयटम नंबर डान्सर’ यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राखीला पुरस्कार मिळाल्यानंतर काहींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं. इतकंच नाही तर तिच्या पुरस्कारावरही काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परंतु या साऱ्यांना राखीने चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर याप्रसंगाचे काही फोटो राखीने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिलाच चांगलंच ट्रोल केलं. “राखी तू हा पुरस्कार विकत घेतलास का?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला. युजर्सच्या या प्रश्नावर राखी चांगलीच भडकली असून तिने या नेटकऱ्याला चांगलंच धारेवर धरलं आहे.

“दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कारासाठी मी पात्र आहे. त्यामुळेच मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. जर मला कोणी ट्रोल केलं तर आता याच पुरस्काराने एकेकाला मारेन”, असं राखी यावेळी म्हणाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राखी तिच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे वादात सापडली होती. या फोटोमध्ये राखीने हातामध्ये पाकिस्तानचा झेंडा घेतला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “माझं भारत देशावर प्रचंड प्रेम आहे. पण हा फोटो माझ्या आगामी ‘धारा ३७०’ या चित्रपटातील लूकचा आहे”. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.

First Published on May 15, 2019 12:03 pm

Web Title: rakhi sawant get angry on trolls says don not troll me otherwise i will hit you by this award