News Flash

चिमुकल्या फॅनकडून राखीला महागडा मोबाइल गिफ्ट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

गिफ्ट पाहून राखी थक्क

राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. बिग बॉसचा शो संपला असला तरी राखीच्या चर्चा काही संपताना दिसत नाहित. नुकतीच राखी गोवा ट्रीपवरून परतली आहे. गोव्यामध्ये राखीने चांगलीच धमाल केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गोवा ट्रीपचे अपडेट चाहत्यांना दिले आहेत.

गोवा ट्रीपमध्ये राखीला एक लहागी फॅनदेखील भेटली. या चिमुकलीसोबत राखीने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र या चिमुकल्या फॅनने राखीला एक खास गिफ्ट दिलंय. हे गिफ्ट पाहून राखीला आनंदाचा धक्का बसला. या चिमुकल्या फॅनने एक महागडा फोन गिफ्ट केला आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीने शेअर केलेल्या व्हिडीओत एक चिमुकली राखीला एक बॉक्स देताना दिसतेय. राखीने पावरी स्टाईलने तिच्या या फॅनची ओळख करून दिली आहे. “ये मैं हूं, ये मेरी फैन है पारुल और ये मेरे लिये क्या लाई है? एक सरप्राइज गिफ्ट.’ असं म्हणत राखीने फोनच्या अनबॉक्सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. फोन पाहिल्यानंतर राखील आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसतंय. ” एवढा मोठा फोन कसा असू शकतो?” असं ती म्हणाली आहे. त्यानंतर तिने या चिमुकलीला मिठी मारत तिचे आभार मानले आहेत.

असं मिळेल करोनावर नियंत्रण; राखी सावंतने सांगितला उपाय!

तर राखी सावंतला गिफ्ट करण्यात आलेला फोन हा 40 किंवा 50 हजारांचा नाही. तर जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल राखीला तिच्या फॅनने गिफ्ट केला आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेक चाहत्यांनी राखीला गिफ्ट मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:55 pm

Web Title: rakhi sawant get expensive phone as gift from little fan in goa kpw 89
Next Stories
1 तारीख पे तारीख! अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ला मिळेना मुहुर्त..
2 करोनावर मात करण्यासाठी मिलिंदने घेतला ‘हा’ खास काढा, पोस्टद्वारे सांगितली रेसिपी
3 इतिहास जिवंत होणार…, शिवरायांच्या शिलेदारांची शौर्यगाथा
Just Now!
X