News Flash

बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतच्या नवऱ्याची एण्ट्री?

राखीच्या नवऱ्याला अद्याप कोणी पाहिलेले नाही.

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’ चर्चेत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये राखी सावंत, विकास गुप्ता, अर्शी खान या स्पर्धकांची एण्ट्री होताच शो आणखी रंजक झाल्याचे पाहायला मिळते. राखी आणि घरातील इतर सदस्यांमध्ये सुरु असलेली मजामस्ती पाहणे प्रेक्षकांना आवडत आहे. पण शो दरम्यान राखीला तिच्या पतीला आठवण येत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आगामी भागामध्ये राखीच्या पतीची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कलर्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसने राखीला कन्फेशन रुममध्ये बोलावले आहे. तेव्हा बिग बॉस राखीला विचारतात, ‘राखी तुला घरात कसे वाटत आहे?’ त्यावर राखी उत्तर देत म्हणते, ‘मला माझा पती रितेशची खूप आठवण येते.’ नंतर बिग बॉस राखीला स्टोओर रुममध्ये तिच्यासाठी काही तरी सरप्राइज असल्याचे सांगतात आणि प्रोमो संपतो. त्यामुळे आगामी भागात राखीच्या पतीची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

२०१९मध्ये राखी सावंतने गुपचूप लग्न केले. तिने ब्राइडल लूकमधील फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली होती. तिने रितेश नावाच्या एनआरआयशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. आता बिग बॉसच्या घरात त्याची एण्ट्री होणार असल्याने त्याला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 5:25 pm

Web Title: rakhi sawant husband ritesh to enter bigg boss 14 house soon avb 95
Next Stories
1 गृहिणींना पगार देण्याचं थरुरांनी केलं स्वागत; कंगना म्हणाली, “जोडीदारासोबतच्या सेक्ससाठी…”
2 म्हणून ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीच्या पतीला चाहत्यांनी सुनावले होते
3 सनी लिओनीचा ‘मस्ती ऑन सेट’ व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X