News Flash

….म्हणून राहुल-दिशाच्या लग्नाला जाणार नाही राखी सावंत

उद्या मुंबईतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहुल-दिशाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण राखी सावंत त्यांच्या लग्नाला जाणार नाही. याचं कारण देखील तिने शेअर केलंय.

‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला काही तास शिल्लक राहिले आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधीतील फोटोज आणि व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. उद्या मुंबईतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण राखी सावंतने या दोघांच्या लग्नाला न जाण्याचं ठरवलंय. याचं कारण देखील तिने शेअर केलंय.

अभिनेत्री राखी सावंतचं नव्याने आलेलं गाणं ”ड्रीम में एंट्री’ला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. या गाण्याने १७ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. त्यानंतर नुकतंच तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तसंच राहुलने दिशासाठी गायलेलं ‘मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना’ या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर बोलताना राखी सावंतने लग्नबंधनात अडकणाऱ्या या लव्ह बर्ड्सचं कौतुक केलंय. यावेळी बोलताना राखी सावतं आणखी एक खुलासा केलाय. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नात न जाण्याचा निर्णय तिने घेतलाय. यावेळी पुढे बोलताना तिने लग्नात न जाण्यामागचं कारण देखील सांगितलं.

राहुल-दिशाच्या लग्नात न जाण्याचं कारण सांगताना राखी सावंत म्हणाली, “त्यांच्या लग्नात जाण्यासाठी हेअर, मेकअप आणि कपडे इतकं सारं कुठून आणणार? त्यामूळे लग्नात जाऊ शकणार नाही.” राखी सावंत त्यांच्या लग्नात जरी जाणार नसली तरी त्या दोघांना लग्नानंतर १७ जुलैला भेटण्यासाठी जाणार आहे. याबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली, “राहुल आणि दिशाच्या लग्नातले लाडू खायला लग्नानंतर जाणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या गेल्या काही दिवसांपासून म्यूजिक व्हिडीओ आणि स्टेज शो करण्यात व्यस्त आहे. इतकंच नाही तर इंडियन आयडल १२ मध्ये ती प्रमुख पाहूणे म्हणून आली होती. नुकतंच रिलीज झालेल्या तिचा म्जूजिक व्हिडीओ ‘ड्रीम में एंट्री’ या गाण्याला यश मिळालं असून जवळपास १७ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हे गाणं पाहिलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 8:38 pm

Web Title: rakhi sawant not attending all the wedding functions of rahul vaidya and disha parmar prp 93
Next Stories
1 १९४ दिवसात ३०१ पारितोषिके पटकाविणारी सोन्याहून पिवळी ‘काळी माती’!
2 भाईजान भडकला! पहिल्यांदाच ट्रोलर्सना उत्तर देत म्हणाला…
3 अल्लू अर्जुनची ४ वर्षाची मुलगी समांथा अक्किनेनीसोबत झळकणार, साउथ सिनेमातून अभिनयात पदार्पण
Just Now!
X