News Flash

मोदीजी, करोनाचा खात्मा करण्यासाठी मी चीनला चाललेय: राखी सावंत

राखी सावंतने इन्स्टाग्रामावर पोस्ट केलेला व्हिडिओ झाला व्हायरल

राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वक्त्यांमुळे आणि स्टंटबाजीमुळेच चर्चेत असते. राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये राखीने चक्क करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी आपण चीनमध्ये जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच करोना व्हायरसचा खात्मा केल्याशिवाय आपण चीनमधून परतणार नाही असंही या व्हिडिओत राखीने म्हटलं आहे.

काय म्हणाली आहे राखी

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या व्हिडिओला एका ओळीची कॅप्शन दिली आहे. “करोना व्हायरसला संपवण्यासाठी मी चीनमध्ये जात आहे,” असं हा व्हिडिओ पोस्ट करताना राखी म्हटली आहे. या व्हिडिओला लाखभर व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत राखी विमानामध्ये बसल्याचे दिसत आहे. “मी आता विमानात असून चीनला जात आहे. करोना व्हायरसला मारण्यासाठी माझ्याबरोबर अनेक शिपाई सुद्धा आहेत. मी त्या व्हायरसला संपवून परत येणार आहे. आता कोणीही या व्हायरसने आजारी पडणार नाही. मोदीजी मी चीनला चाललेय. मी सुखरुप परत यावं म्हणून प्रार्थना करा,” असं राखीने या व्हिडिओत म्हटलं आहे. इतकचं नाही तर “मी नासाकडे या व्हायरसला मारण्यासाठी नासाकडे विशेष औषध देण्याची विनंती केली आहे,” असंही राखीने म्हटलं आहे.

विमानतळावर उतरल्यावर म्हणते…

या व्हिडिओमध्ये पुढे राखी विमानातळावरुन बाहेर पडताना दिसते. बाहेर अनेक लोक तोंडावर मास्क घालून फिरताना व्हिडिओत दिसत आहेत. “मित्रांनो मी चीनमध्ये पोहचले आहे. या चीनी कॅम्पमध्ये मी सुद्धा चीनी वाटत आहे. चीनी मीनी चाउ चाऊ व्हायरस को खाऊ खाऊ..” असं राखीने विमानतळावर उतरल्याचं सांगताना म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

काही महिन्यांपूर्वी राखीने स्वत:च्या लग्नाची माहिती दिली होती तेव्हा ती चर्चेत आली होती. मात्र तिचा पती कोण आहे हे अद्याप तिने सांगितलेलं नाही.

चीनला आर्थिक फटका

चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरला असून, बळींची संख्या ४२५ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या २० हजारांहून अधिक झाल्याने चीनची करोनाशी झुंज सुरू आहे. या संकटाचा फटका चीनच्या शेअर बाजाराला बसला आहे. चीनी बाजार कोसळत असल्याने देशासमोर आर्थिक आव्हानही उभे ठाकले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:36 pm

Web Title: rakhi sawant reached china to kill coronavirus instagram video goes viral scsg 91
Next Stories
1 अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने सलमान, अक्षय, रणवीर सिंगच्या चित्रपटांना टाकलं मागे
2 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’संदर्भातील त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका’; अमोल कोल्हेंचे आवाहन
3 “शौचास कुठे बसावं हे न कळणारे करतायत CAA ला विरोध”
Just Now!
X