News Flash

Video: राखी सावंतने फाडले राहुल महाजनचे कपडे; बिग बॉसच्या घरात तुफान गोंधळ

बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य राखीवर भडकले.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉसचा १४वा पर्व सुरू आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र, बिग बॉसच्या घरात राखीने कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान असं काही केलं की सोशल मीडियावर ती सध्या जोरदार ट्रोल होत आहे.

बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्याला एक टास्क दरम्यान घरातल्या कॅप्टनची निवड केली जाते. राखी, स्वत:ला जुली म्हणजेच बिग बॉसच्या घरात असलेली एक आत्मा असल्याचं ती सांगते. कलर्स टिव्हीने बिग बॉसचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जूलीने ठरवलं आहे की बिग बॉसच्या घरात आता कोणी कॅप्टन होणार नाही. राखीने सगळ्यांना त्रास द्यायला सुरूवात केली आहे. या दरम्यान राखीने राहूल महाजनचे कपडे फाडले. हे पाहून अली गोणी भडकतो आणि राखीला ओरडतो. हेच जर एखाद्या स्त्रीसोबत झालं असंत तर ते स्वीकारलं असतं का, असा संतप्त सवाल तो करतो.

आणखी वाचा : दिशा पटानीचा बिकिनी फोटो व्हायरल; फक्त दोन तासांत मिळाले इतके लाख लाइक्स

या गोंधळानंतर कॅप्टन्सी टास्क तिथेच थांबवण्यात आला आणि सगळा सेटअप काढून टाकण्यात आला आहे. राखी आणि राहूल एकमेकांना आधी पासून ओळखतात. राखी राहूलला तिचा १२ वर्ष जुना मित्र असल्याचे सांगते. तर राहूल नेहमी बोलतो की, तो राखीला फक्त ‘राखी का स्वयंवर’ या शोमध्ये भेटला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 6:38 pm

Web Title: rakhi sawant rip rahul mahajans dhoti in big boss dcp 98
Next Stories
1 अभिनेत्रीला करावी लागली इमर्जन्सी सर्जरी; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट
2 ज्योतिबाला कसा मिळाला उन्मेष अश्व?
3 “मी रुग्णालयात दाखल होताच त्याने..”; रेमोने केलं सलमानचं कौतुक
Just Now!
X