News Flash

Video : राखी सावंतच्या कथित प्रियकराला भररस्त्यात मारहाण

खुद्द दीपकनेच त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

अभिनेत्री राखी सावंतचा कथित प्रियकर दीपक कलाल याला दिल्लीत भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळेस कारशेजारी उभा असलेल्या दीपकला एका अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

कॉमेडियन दीपक कलाल ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रकाशझोतात आला. सोशल मीडियावर दीपक बरेच व्हिडिओ शेअर करत असतो. यापैकी काही व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. याच व्हिडिओवर आक्षेप घेत संबंधित व्यक्तीने दीपकला मारहाण केल्याचं समजतंय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने दीपकला आतापर्यंत पोस्ट केलेल्या सर्व व्हिडिओसाठी माफीसुद्धा मागण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे भविष्यात पुन्हा असे कोणतेच आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची धमकीसुद्धा त्याने दीपकला दिली.

खुद्द दीपकनेच त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यावर अनेकांनी टीका केली असून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

दीपकशी लग्न करणार असल्याचं राखी सावंतने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. दीपक त्याचे फोटो आणि आगळ्यावेगळ्या व्हिडिओसाठी ओळखला जातो. त्याच्या याच चित्रविचित्र व्हिडिओजमुळे सोशल मीडियावर त्याचे असंख्य चाहते आहेत. विशेष म्हणजे इंटरनेट सेन्सेशन बनण्यापूर्वी दीपिक पुण्यातील एका हॉटेलात रिसेप्शनिस्ट होता.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 10:02 am

Web Title: rakhi sawant rumoured boyfriend deepak kalal beaten in delhi video viral on social media
Next Stories
1 अनु आणि सिध्दार्थमध्ये येणार दुरावा ?
2 वाद निर्माण करायचा नाही, ‘श्रीदेवी बंगलो’वर प्रियाचं स्पष्टीकरण
3 #10YearChallenge : मराठी कलाकार १० वर्षापूर्वीचे आणि आताचे
Just Now!
X