सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू तसेच काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल ठरवला आहे. हा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राखी सावंतचं ऐकून घेतला आहे. असं आम्ही नाही तर खुद्द राखी सावंत म्हणतेय. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि वायफळ बडबड करणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओमध्ये ती अनुच्छेद ३७० बद्दल बोलताना दिसतेय.

”मोदीजी, मला तुमचा फार अभिमान आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, तुमच्यासारखा कोणी नाही. आर्टिकल ३७० वर येणाऱ्या चित्रपटात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार. काश्मीर आणि कुलूमध्ये या चित्रपटाची शूटिंग होणार आहे. पण सर्वांत आधी आम्ही तो मुद्दा उचलला होता. माझं ऐकल्याबद्दल मोदीजींचे आभार,” असं ती या व्हिडीओत म्हणतेय. सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्याचं श्रेयच राखी स्वत: घेताना दिसतेय.

राखीचा हाच व्हिडीओ शेअर करत कौशल इनामदार यांनी तिची खिल्ली उडवली आहे. ”राखी सावंतचं नाव तुमच्या भाषणात न घेऊन तुम्ही फार चुकीचं केलंत मोदीजी. तिच्यामुळेच अनुच्छेद ३७० रद्द झाला आङे. मी कविता कृष्णन यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आंदोलन राखीकडे सोपवावं कारण ती अनुच्छेद ३७० रद्द होण्यामागे राखीचा मोठा वाटा आहे,” असं संगीतकार कौशल इनामदार यांनी लिहिलं.

राखी सावंत कधी कोणतं विधान करेल याचा नेम नाही. म्हणूनच तिचा हा व्हिडीओ पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं जात आहे.