आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखीने नुकताच अमेरिकेतील एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केले आहे. परंतु तिने तिच्या लग्नाबाबत गोपनियता बाळगली होती. आता राखीने तिच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राखीने लाल रंगाचा वन पिस परिधान केला आहे. राखीने त्यावर सन ग्लासेस देखील लावले आहेत. या लूकमध्ये राखी अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. राखीचा हा लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

https://www.instagram.com/p/B1GmoL0nq6u/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B1GnUKDHFUP/?utm_source=ig_web_copy_link

राखीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात व्हॉट्सअप अॅप वरुन झाली. ‘सुरुवातीला आमच्यात मैत्रीचे नाते होते. नंतर हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलू लागलो आणि भेटू लागलो. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे समजलेच नाही. ही दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे’ असे राखीने सांगितले. ‘माझा नवरा युकेला राहतो. माझा व्हिसा अजून मिळायचा आहे म्हणून मी इथे थांबलीये. व्हिसा आल्यावर मीसुद्धा तिथेच जाईन’ असा खुलासा राखीने केला होता.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये राखीने अचानक सोशल मीडियावर स्वत:च्या लग्नाची पत्रिका पोस्ट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दीपक कलालसोबत ती लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर दीपक कलालनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतला प्रपोज केले होते. मात्र हे लग्न सत्यात काही उतरलं नाही. त्यामुळे राखी सावंत कधी काय करेल याचा काही नेम नाही.