26 January 2021

News Flash

‘मंत्र्याचा मुलगा का पकडला जात नाही?’, भारती सिंह ड्रग्ज केसवरुन राखीचा सवाल

पाहा व्हिडीओ..

केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी छापा घातला होता. भारती सिंहच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामिनाचा अर्ज मंजुर झाला. दरम्यान यावर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने वक्तव्य केले आहे.

सतत चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने भारती सिंह ड्रग्ज प्रकरणावर वक्तव्य करत प्रश्न विचारला आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने राखी सावंतचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘सध्या जे काही सुरु आहे, अनेकांच्या घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात याची कोणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही. मला फक्त इतकच हवं आहे नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? संपूर्ण देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?’ असे राखी म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा- भारती सिंहवरुन ट्रोल केल्यामुळे भडकला कपिल, म्हणाला ‘पहिले तुझ्या…’

पुढे ती म्हणते ‘मला हा फंडा समजतच नाही. सर्वात पहिले भारतीसोबत असे काही होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे, तिचा सर्वजण आदर करतात. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. कोणी तरी त्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:30 pm

Web Title: rakhi sawant speaks on bharti singh drugs case avb 95
Next Stories
1 ‘माझ्या प्रिय मित्रा…’, मधुर भांडारकर यांच्या आरोपांवर करण जोहरची प्रतिक्रिया
2 Birthday Special : बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात? जाणून घ्या कारण
3 कंगना रणौतवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य, म्हणाले…
Just Now!
X